कपिल शर्माच्या शोमधून सुमोना चक्रवर्तीला राम राम? अभिनेत्रीच्या इमोशनल पोस्टमुळे सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा


काही शो, काही कार्यक्रम असे असतात जे एखाद्या कलाकाराला आयुष्यभरासाठी ओळख मिळवून देतात. कलाकारांची ओळख ही फक्त त्या शो, कार्यक्रमावरून सर्व जगात होते. कलाकारांसाठी ही ओळख खूप महत्वाची ठरते. हे शो कलाकारांसाठी त्यांच्या मनाच्या खूप जवळ असतात. मात्र कधी कधी अचानक काही कारणांमुळे कलाकारांसाठी त्यांचे हे शो एक आठवण बनून राहतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून पहिले नाव येते ‘द कपिल शर्मा शो’चे. या शोने तुफान लोकप्रियता मिळवली. या शोसोबतच शोमध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकरांना देखील भरपूर लोकप्रियता मिळाली. या शोमधील महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुमोना चक्रवर्ती.

लवकरच कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरु होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या शोसंदर्भातले अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र या फोटोंमध्ये एक चेहरा आपल्याला गायब दिसतोय आणि तो चेहरा आहे सुमोनाचा. कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या सुमोनाला या शोने तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र आता कपिलच्या लवकरच सुरु होणाऱ्या या शो मध्ये सुमोना दिसणार नसल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. (sumona chakravarti missing from kapil sharma show)

Photo Courtesy : Instagram/kapilsharma

शो सुरु होण्याआधी या शोचे सर्व कलाकार एकत्र दिसले, मात्र या सर्वांमध्ये सुमोना कुठेच दिसत नाही. त्यानंतर आलेल्या टीझर व्हिडिओमध्ये देखील सुमोना दिसली नाही. यावरून आता अंदाज लावला जात आहे की, नव्याने सुरु होणाऱ्या या शोमध्ये सुमोना दिसणार नाही. यावर चर्चा सुरु असतानाच सुमोनाने सोशल मीडियावर असे काही पोस्ट केले, ज्यामुळे ही वाटणारी शक्यता आता खरी आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

instagramkrushna30

सुमोनाने तिच्या इंस्टास्टोरीवर चारलोट फ्रीमैन यांचे पुस्तक Everything You’ll Ever Need ला कोट करत लिहिले, “जर तुम्ही कोणाला योग्य संधी देत नाहीत, तर तुम्ही कधीच जाणून नाही घेऊ शकत की, कोणती गोष्ट तुमच्यासाठी बनली आहे की नाही. कोणते नाते असो, नवीन नोकरी असो, नवीन शहर असो किंवा नवा अनुभव. स्वतःला त्यात पूर्णपणे समर्पित करा आणि मागे वळून पाहू नका. जर गोष्टी योग्य नाही झाल्या, तर समजा की हे तुमच्यासाठी बनलेले नव्हते आणि तुम्ही कोणत्याही पश्चातापाशिवाय तिथून निघून जाल. हे माहित असूनही की तुम्ही त्यात तुमचे १०० टक्के प्रयत्न केले आहेत. तुम्ही नेहमी हेच करू शकतात. कोणत्याही गोष्टीला अशा परिस्थितीत सोडणे जेव्हा तुम्हाला माहित आहे की, तुम्ही यात अजून प्रयत्न करू शकतात ही भावना भीतीदायक असते.”

मागील काही काळापूर्वी तिने हे देखील सांगितले होते की, लॉकडाऊननंतर तिच्याकडे कोणतेही काम नव्हते. आता येणारा काळच नक्की काय आहे हे सांगेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते…’, म्हणत ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले दु;ख

-तुरुंगात राहूनही मोडला नाही राज कुंद्राचा माज; चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी…

‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.