तुरुंगात राहूनही मोडला नाही राज कुंद्राचा माज; चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी…


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांचने अश्लील चित्रपट बनवून, ते ऑनलाईन ऍपद्वारे पब्लिश केल्याच्या आरोपाखाली अटक केले आहे. आता त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे. तोच मुख्य गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत अनेक कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. काहींनी राज हा निर्दोष असल्याचे देखील सांगितले आहे. त्याच्याबाबत आता आणखी नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही दिवसांपूर्वी या प्रकारणाबाबत अटक केले आहे. याबाबत बरीच माहिती देखील समोर आली आहे. 

समोर आलेल्या वृत्तानुसार, तुरुंगात असूनही राज कुंद्राचा अहंकार कमी झाला नाही. तो अजूनही रुबाब दाखवत आहे. राज कुंद्रा पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरं देत नाहीये.

माध्यमातील वृत्तानुसार, पोलिस जेव्हा राज कुंद्राला प्रश्न विचारतात तेव्हा तो त्यांना नीट उत्तर देत नाहीये. पण तो असे का वागत आहे या बाबत कोणीही अंदाज लावू शकत नाहीये. कदाचित त्याला असे वाटत असेल की, तो सुटणार आहे तर पोलिसांना का सहकार्य करायचं? पण पोलिसांकडे राज कुंद्रा विरोधात ठोस पुरावे आहेत, त्यामुळे तो सहज यातून बाहेर पडेल याची शक्यता खूप कमी आहे. (Raj Kundra is not cooperating in the police investigation)

आता असा अंदाज लावल जात आहे की, पोलिसांना सहकार्य न करून राज कुंद्रा त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हिला देखील वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पोलिस तिची देखील चौकशी करत आहेत. जर त्यांना तिच्याबाबत काही माहिती मिळाली तर शिल्पाचे वाचणे देखील कठीण आहे.

आता अशी माहिती समोर आली आहे की, मुंबई क्राईम ब्रांच शिल्पाला चौकशीसाठी बोलवू शकतात. पण अजून त्यांच्याकडून अशी कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

राज कुंद्रा याने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपवर दाखवल्या प्रकरणी त्याला अटक केले गेले आहे. क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, राज कुंद्राने त्याच्या या बिझनेसमध्ये १० कोटी रुपये गुंतवले होते. खरंतर फेब्रुवारी महिन्यातच या गोष्टीची माहिती मिळाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे. पण आता तसा ठोस पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये केलेल्या तपासावरून ही माहिती समोर आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.