Latest Posts

‘चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते…’, म्हणत ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले दु;ख


बॉलिवूडमध्ये आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार ऍक्शनने प्रेक्षकांचे अनेक दशकं मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे हिमॅन धर्मेंद्र. ८६ वर्षाच्या धर्मेंद्र यांनी वयाच्या २५ व्या वर्षी अभिनयाच्या जगात पदार्पण केले. त्यानंतर आजतागायत ते त्यांच्या कामातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज जरी धर्मेंद्र यांनी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले असले, तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, फोटो शेअर करत धर्मेंद्र नेहमीच फॅन्समध्ये त्यांची उपस्थित दर्शवतात.

धर्मेंद्र यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे एक दुःख देखील व्यक्त केले आहे. धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यात त्यांनी चित्रपट आणि खरे आयुष्य यातला फरक दाखवला आहे. (dharmendra takes a dig at film industry with guddi video)

धर्मेंद्र यांनी एक वेगळा व्हिडिओ तयार केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ ‘गुड्डी’ चित्रपटातील आहे. या सिनेमात धर्मेंद्र यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमात जया बच्चन मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमात जया धर्मेंद्र त्यांच्या मोठ्या फॅन असतात. त्यामुळे जया यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांची ही भूमिका चित्रपटात होती. धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले, “चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते. मित्रांनो, गुड्डीमध्ये या चमकणाऱ्या याच्या खऱ्या गोष्टीवरून पडदा बाजूला करण्यात आला होता. अतिशय दुखी अंतकरणाने सांगतो, मोहन स्टुडिओचे हे स्टेज जळाले होते. इथेच माझे स्क्रिन टेस्ट झाली होती.”

जया बच्चन यांच्या गुड्डी चित्रपटातील या विशिष्ट सीनमध्ये धर्मेंद्र सांगतात, “इथेच मी माझे करियर सुरु केले होते, बिमल दा यांच्यासोबत. बिमल रॉय तेव्हा बंदिनी सिनेमा तयार करत होते. आता हा स्टुडिओ नष्ट झाला आहे. दो बीघा जमीन, बंदिनी, मधुमती असे अनेक मोठे सिनेमे इथे तयार झाले. आता कोणाला ते नाव लक्षात असतील. अंधुक होत होत एक दिवस ही नावेदेखील नष्ट होतील आणि ही जागा कलेचे तीर्थस्थान असायला हवी होती, पण आता इथे साबणाची फॅक्ट्री तयार होईल.”

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत असून, धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. सोबतच त्यांनी एवढा चांगला अभिनय करूनही त्यांना पुरस्कार मिळाला नसल्याची खंत देखील व्यक्त केली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल

अनुपम खेर यांनी शेअर केला त्यांच्या टफ वर्कआऊटचा व्हिडिओ; फिटनेस बघाल तर व्हाल हैराण

‘पुन्हा भेटले यारी दोस्तीतील यार दोस्त!’, अभिनेता हंसराज जगतापने केला व्हिडिओ शेअर 


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss