वयाच्या ४थ्या वर्षी दिला पहिला परफॉर्मन्स; आज एका गाण्यासाठी तब्बल ‘इतकी’ रक्कम घेते सुनिधी चौहान

बॉलिवूडची सुंदर गायिका सुनिधी चौहान गेल्या २० वर्षांपासून आपल्या गायनाने सर्वांना प्रभावित करत आहे. तिने लहानपणापासूनच गाणे गायला सुरुवात केली. फार कमी लोकांना माहित आहे की, तिने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ‘शस्त्र’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये गायनाची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. वयाच्या ११ व्या वर्षी सुनिधी तिच्या वडिलांसोबत मुंबईत आली होती. तिच्या वडिलांना खात्री होती की, त्यांची मुलगी एक दिवस बॉलिवूडमध्ये मोठे स्थान गाठेल आणि तिने देखील तेच केले. मुंबईत आल्यानंतर सुनिधीने ‘मेरी आवाज सुनो’ हा रियॅलिटी शो जिंकला आणि तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका दमदार अंदाजात केली. आज आपण तिच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.

View this post on Instagram

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5)

सुनिधी वयाच्या ४ थ्या वर्षापासून परफॉर्म करत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर गायिकाने आपले स्थान प्राप्त केले आहे. जिथे आज ती बॉलिवूडच्या सर्वात महागड्या गायिकांपैकी एक आहे. याशिवाय, सुनिधी तिचे स्टेज शो जगभरात करते. जिथे लाखो प्रेक्षक तिचं गाणं ऐकण्यासाठी येतात. एकंदरित या सर्वांमुळे सुनिधीने मुंबईत स्वतः ची चांगलीच मालमत्ता कमवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ७३.६७ ते ७६.६७ कोटी आहे. त्याचवेळी सुनिधी बॉलिवूड चित्रपटातील गाणे गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये घेते. तिने अनेक मोठ्या शोला जज देखील केले आहे. त्यामध्ये ‘द व्हॉईस’ आणि ‘इंडियन आयडल’ यांचा समावेश आहे. सुनिधीने अनेक मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यातही उत्तम कामगिरी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5)

अभिनेत्री तबस्सुमने घडवलंय सुनिधी चौहानचं करियर
फार कमी लोकांना माहिती आहे की, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुमने सुनिधीच्या करियरसाठी मोठे योगदान दिले आहे. सुनिधी यापूर्वी आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत होती. जिथे एके दिवशी तबस्सुमने तिला एक गाणे गाताना ऐकले. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना बोलावले आणि तिला मुंबईला पाठवायला सांगितले. तबस्सुमचे बोलणे ऐकून सुनिधीच्या वडिलांनी लगेच तिला मुंबईत आणले. त्यानंतर सुनिधीने गायन रियॅलिटी शो ‘मेरी आवाज सुनो’ या स्पर्धेत भाग घेतला. हिंदीशिवाय सुनिधीने मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी आणि उर्दू भाषेतही गाणी गायली आहेत. आज सुनिधीला बॉलिवूडचा प्रत्येक दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता ओळखतो. गायनाच्या क्षेत्रात ती सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे तिचे शेकडो चाहतेही तिला खूप पसंत करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

Latest Post