गोविंदाच्या गाण्यावर डान्स करून मुलाने सोशल मीडियावर लावली आग, सुपरस्टार सुनील शेट्टीनेही केले कौतुक

Suniel Shetty Got Impressed With Boy Dancing On Govinda Songs Said Lets Make Him Famous


सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला फार वेळ नाही लागत. आपल्यातील टॅलेंट, डान्स, गाणे यामुळे सेलिब्रिटी तर सोडा पण अगदी सामान्य नागरिकदेखील रातोरात लोकप्रिय होतात. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. या मुलाचा डान्स पाहून सोशल मीडियाचे युझर त्याचे खूप कौतुक करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या मुलाच्या व्हिडिओने बॉलिवूड सुपरस्टार ‘सुनील शेट्टी’चे देखील लक्ष वेधून घेतले आहे.

सुनील शेट्टीने या मुलाच्या व्हिडिओला त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहे. त्या सोबतच त्याने असे लिहिले आहे की, ‘चला या मुलाला लोकप्रिय बनवूयात.’ या मुलाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळतायत. बऱ्याच प्रेक्षकांना त्याचा हा व्हिडिओ आवडला देखील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सुनील शेट्टी म्हणाला की, “धन्यवाद ‘आशिष चौहान’ की तुम्ही या मुलाच्या टॅलेंटला जगासमोर आणले.”

हा व्हिडिओ बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आशिष चौहान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतपर्यंत 80 हजारांपेक्षाही जास्त वेळा बघितलले गेले आहे. सुनील शेट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आताच झालेल्या शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले होते. त्याच्या या ट्विटमुळे तो बराच चर्चेत आला होता.

सुनील शेट्टी याने एका विदेशी कलाकाराच्या ट्विटला उत्तर दिले होते. जो म्हणत होता की, हे आंदोलन थांबवा. यावर सुनील शेट्टीने असे ट्विट केले की, ‘आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या बातमीचं गांभीर्य लक्षात येतं. अर्धवट ज्ञान हे नेहमी धोक्याचं असतं.’

सुनील शेट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, तो बऱ्याच दिवसापासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तरीही तो लवकरच एका नव्या प्रोजेक्टची घोषणा करेल, याची सर्व चाहत्यांना अपेक्षा आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
-द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


Leave A Reply

Your email address will not be published.