Thursday, June 13, 2024

काय सांगता! गोविंदाच्या सासूनेच वाचले होते त्याचे प्रेमपत्र, अशी होती गोविंदा आणि सुनीताची प्रेमकहाणी । Sunita Ahuja Birthday

हिंदी चित्रपट जगताचा दमदार अभिनेता अशी गोविंदाची (Govinda) खास ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि भन्नाट डान्सने गोविंदाने अनेक दशके चित्रपट जगतावर अधिराज्य गाजवले आहे. गोविंदाच्या अभिनयाची आणि चित्रपटांची आजही चर्चा ऐकायला मिळते. अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या गोविंंदाच्या खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा ऐकायला मिळते. आज (15 जून) गोविंंदाची पत्नी सुनीता अहुजा ( Sunita Ahuja ) हिचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दल आणि प्रेमकहाणीबद्दल.

अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांची प्रेमकथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशीच आहे. सुनीता मुंजील यांच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामासोबत लग्न झाले होते. त्यामुळे गोविंदा त्याच्या मामाला भेटायला जात असे आणि सुनीता तिच्या बहिणीला भेटायला जात असे, इथेच या दोघांची भेट झाली आणि याच भेटीचे, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही सध्या त्यांच्या संसारात व्यस्त असले तरी त्यांचा स्वभाव मात्र वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत असतात. याचा खुलासा स्वःत गोविंदाने एका कार्यक्रमात बोलताना केला होता. ( Sunita Ahuja Birthday )

अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा दोघांनाही डान्सची आवड होती. त्यामुळेच त्यांचे नाते आणखी घट्ट झाले. सुनीता यांच्या मते गोविंदा खूपच भावनिक आहे, याच कारणामुळे त्या गोविंदाच्या प्रेमात पडल्या. दोघेही विवाह बंधनात अडकण्याआधी अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. या काळात ते एकमेकांना प्रेमपत्र पाठवत संपर्कात राहायचे. एकदा असाही प्रसंग उभा राहिला होता की त्यांचे हे पत्र सुनीताच्या आईच्या हाती लागले होते. ज्यामध्ये सुनीता यांनी गोविंदाला लवकरच लग्र करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांचे हे पत्र हाती लागल्यानेच घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला. लग्नाच्यावेळी गोविंदा २४ वर्षाचे तर सुनीता फक्त १८ वर्षाच्या होत्या. आज या दोघांना दोन मुलं असून, ते सुखाने संसार करत आहे. बऱ्याचवेळा गोविंदा आणि सुनीता वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. ( actor govinda and his wife sunita love story )

अधिक वाचा –
– मोठी बातमी! देशाचा आवाज हरपला… प्रसिद्ध गायिकेचे दुःखद निधन, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा महापूर
– मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले, “…म्हणुन मी नकार कळवतो”

हे देखील वाचा