Thursday, June 13, 2024

मोठी बातमी! देशाचा आवाज हरपला… प्रसिद्ध गायिकेचे दुःखद निधन, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा महापूर

मनोरंजन विश्वातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. 60 आणि 70च्या दशकातील प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांचे 14 जून रोजी निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा या कर्करोगाने ग्रस्त होत्या. प्रसिद्ध पार्श्वगायकांच्या निधनानंतर बाॅलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 रोजी तामिळनाडूमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

तेहरानमधील एका कार्यक्रमात शारदा यांचे गाणे ऐकल्यानंतर चित्रपट निर्माते राज कपूर यांनी त्यांना ‘सूरज’ चित्रपटासाठी ‘तितली उडी’ गाण्याची ऑफर दिली होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी प्रसिद्ध शंकर जयकिशन जोडीसोबत अनेक हिट गाणी गायली आहेत. शारदा यांनी मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार आणि सुमन कल्याणपूर या लोकप्रिय गायकांसोबत काम केले.

त्यांना 1969 ते 1972 पर्यंत त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले. त्यापैकी ‘जहां प्यार मिली’च्या ‘बात जरा है आप की’साठी त्यांना पुरस्कारही मिळाला. 1966 मध्ये आलेल्या सूरज या चित्रपटातील तिच्या “तितली उडी” या गाण्यासाठी या गायिकेला सर्वात जास्त स्मरणात ठेवले जाते.

शारदा यांनी हिंदी गाण्यांव्यतिरिक्त तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांचा गझल अल्बम ‘अंदाज-ए-बयान और’ 2007 मध्ये रिलीज झाला, ज्यामध्ये त्यांनी मिर्झा गालिबच्या लोकप्रिय गझलांवर आधारित स्वतःची गाणी तयार केली. गायिका शारदा सोशल मीडियावर सक्रिय होत्या. अनेकदा त्या त्यांच्या सोनेरी दिवसांचे व्हिडिओ पोस्ट करत होत्या. वयाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी संगीत सोडले नाही. त्या Titliudi नावाची वेबसाइड चालवत होत्या. त्या वेबसाइडच्या माध्यमातून त्या मुलांना संगीत शिकवत होत्या. (Famous singer Sharda Rajan Iyengar passed away)

अधिक वाचा-
सुशांतच्या पुण्यतिथीला रिया चक्रवर्ती झाली भावुक, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत म्हणाली…
मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले, “…म्हणुन मी नकार कळवतो”

हे देखील वाचा