×

‘हीरो नंबर वन’ला २५ वर्षे पूर्ण; चित्रपट झाला हिट अन् गोविंदाने आनंदात केलं ‘हे’ काम!

अभिनेता गोविंदाच्या (Govinda) गाजलेल्या चित्रपटात ‘हीरो नंबर वन’ चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या चित्रपटाची भन्नाट कथा आजही लोकांना आवडत असते. या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. जाणून घेऊया गोविंदाच्या या गाजलेल्या चित्रपटाबद्दल.

गोविंदा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या दमदार अभिनयाचे आणि डान्सचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गाजलेल्या चित्रपटात गोविंदाने काम केले आहे. मात्र त्याचा सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हीरो नंबर वन’. या चित्रपटातील गोविंदाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. ‘हीरो नंबर वन’ मुळेच गोविंदा हिंदी चित्रपट जगतात लोकप्रिय झाला. या चित्रपटाला सोमवारी (२१ फेब्रुवारी) २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

‘हीरो नंबर वन’ चित्रपट आजही टीव्हीवर पाहणे म्हणजे मोठी पर्वणीच असते. गोविंदाची अफलातून कॉमेडी यामध्ये पाहायला मिळते. ९०च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध आणि आणि गाजलेला चित्रपट म्हणून ‘हीरो नंबर वन’ चित्रपटाचे कौतुक केले जाते. ‘सोना कितना सोना है’, ‘युपी वाला ठुमका’ अशा गाण्यांनी त्या काळात सर्वांना वेड लावले होते. चित्रपटात अभिनेत्री करिश्मा कपूर आणि गोविंदा यांची जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदा यांनी १० चित्रपट काढले. यामध्ये ‘हीरो नंबर वन’ चित्रपट सगळ्यात जास्त गाजला.

साल १९९० मध्ये दिग्दर्शक डेव्हिड धवन, करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या जोडीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट त्या काळात आणले होते. गोविंदा आपल्या कॉमेडी आणि डान्ससाठी प्रसिद्ध होता, तर अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या मनमोहक सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करत होती. डेविड धवन यांचा ‘हीरो नंबर वन’ चित्रपट सगळ्यात जास्त बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाचे शूटिंग फ्रांस, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते. चित्रपटात कादर खान, परेश रावल, सतीश शाह, हिमानी शिवपुरी असे अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. या चित्रपटाने गोविंदाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. म्हणूनच या चित्रपटाच्या नावावरुन गोविंदाने २०१६ मध्ये एक हॉटेलसुद्धा काढले आहे.

हेही वाचा –

Latest Post