×

चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम! समोर आली किंग खानच्या ‘पठाण’ची रिलीझ डेट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) जेव्हा त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत असतो, त्यावेळी त्याचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची क्रेझ आहे. शाहरुख आता त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी सांगितले की, हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या घोषणेसोबतच एक अनाउंसमेंट व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपट पाहण्याची इच्छा आणखी वाढेल. जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ‘पठाण’बद्दल सांगताना दिसणार आहेत, ‘पठाण’साठी भारत कसा त्याचा धर्म आहे. यानंतर ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख (Shahrukh Khan) स्वत: अंधुकपणे पडद्यावर येतो आणि म्हणतो की, त्याचे नाव पठाण कसे पडले, यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल.

‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले असून, आदित्य चोप्रा या चित्रपटाचा निर्माता आहे. शाहरुख ‘पठाण’ चित्रपटात भारतीय रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका सोबतच्या भूमिकेत, तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत असल्याने, दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला चित्रपटाला खूप फायदा होईल.

शाहरुख २०१८ साली ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माही दिसली होती. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता तो थेट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ डायरेक्टर एटली आणि राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर किंग खान आणि ‘पठाण’  सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. पठाणचा टीझर पाहिल्यानंतर चाहते उत्साहित दिसत आहेत आणि सोशल मीडियावर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत. किंग खानच्या टीझर व्हिडिओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावरूनच त्याचे चाहते शाहरुख खानच्या चित्रपटाची किती आतुरतेने वाट पाहत असतील याचा अंदाज बांधता येईल.

एका युजरने लिहिले की, ”राजा परत आला आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “मी रडत आहे, तुम्ही रडत आहात, सगळे रडत आहेत, आमचा राजा परत आला आहे.” आणखी एका युजरने मीम शेअर करत लिहिले की, “मिठाई वाटा, आनंदाचे वातावरण आहे.” एकाने लिहिले की, ”हे खरे आहे का, माझ्या अंगावर शहारे उभे राहिले आहेत.”  ‘पठाण’च्या घोषणेने चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह भरला आहे.

हेही वाचा – 

Latest Post