Wednesday, July 3, 2024

‘गदर 2’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; 17व्या दिवशी जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

गदर 2‘ चित्रपटने बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘गदर 2‘ चित्रपटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गाडीवर नाही तर ट्रॅक्टर घेऊन थेट चित्रपट गृहात जात आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या चित्रपटला अनेक चित्रपट बाॅक्स ऑफिसवर टक्कर देत आहेत. ‘गदर 2’चित्रपटाने 500 कोटींच्या घरात पोहचला आहे. चला तर मग जाणून घेऊया 17 व्या दिवशी किती केली या चित्रपटाने कमाई.

दुसऱ्या आठवड्यात ‘गदर 2‘ (Gadar 2)कमाईच्या बाबतीत मोठा घसरन झाली. पण परत या चित्रपटाने मान वर काळली तर आता ते थांबायचं नाव घेत नाही. असे असतानाही ‘गदर 2’ने (Gadar 2 Movie) रविवारी एकाच दिवशी चांगली कमाई केली आहे. KGF 2 ला मागे टाकल्यानंतर, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला जमवलाआहे.

सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) या जोडीने ‘गदर-2’ द्वारे 22 वर्षांनंतर चित्रपटाच्या पडद्यावर पुनरागमन करून मोठा कहर केला आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ ला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर ‘OMG 2’ला टक्कर देणार्‍या या चित्रपटाने यापूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते. काही दिवसांपूर्वी सनी देओलने आमिर खानच्या ‘दंगल’ला मागे टाकले होते.

या चित्रपटांनंतर नुकतेच अनिल शर्माच्या ‘गदर 2’ ने रॉकी भाईच्या ‘KGF-2’चे रेकाॅर्ड तोडले आहे. ‘गदर 2’ आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली होती आणि पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला. माध्यमातील वृत्तानुसार, 17 व्या दिवशी, चित्रपटाने एकूण 17 कोटींचे एक दिवसाचे कलेक्शन केले आहे. जे ‘ड्रीम गर्ल-2’ च्या कलेक्शनपेक्षा 1 कोटी अधिक आहे. ‘गदर 2’ ने आतापर्यंत भारतात एकूण 456.95 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट लवकरच जगभरात 600 कोटींचा आकडा पार करून नवा विक्रम रचण्यात यशस्वी होऊ शकतो. (Sunny Deol’s Ghadar 2 crosses the Rs 500 crore mark)

अधिक वाचा-
अंगुरी भाभी बनून शिल्पा शिंदेने केली प्रेक्षकांवर जादू, पटकावलाय मिस इंडियाचा किताब
‘असा’ आहे अभिनेता एजाज खानचा सिनेसृष्टीतील प्रवास; तब्बल 50 मालिकांमध्ये केले काम

हे देखील वाचा