‘भुज’ चित्रपटातील ‘हंजूगम’ गाणे रिलीझ; अजय अन् प्रणिताच्या जोडीने वेधले सर्वांचे लक्ष


बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. देशप्रेमावर आधारित कहाणीवर बनलेला हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरने यापूर्वीच चित्रपटाची झलक दाखवली आहे. अशातच आता चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याचे बोल जरा वेगळे आहेत आणि त्यामुळे गाणे चाहत्यांच्या ओठांवर लवकर रुळण्याची अपेक्षा आहे.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचे नाव ‘हंजूगम’ आहे. हे गाणे अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाषवर चित्रीत करण्यात आले आहे. या दोघांच्या रोमँटिक जोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यांची जोडी आणि गाण्याची कमाल आहे की, प्रदर्शित होताच हे गाणे सोशल मीडियावर भलतेच झळकत आहे. (Superstar Ajay Devgan Upcoming Film Bhuj First Song Hanjugam Release Today)

या गाण्यात एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत अजय अप्रतिम अंदाजात दिसत आहे. हे गाणे देवशी खंडूरी यांनी लिहिले आहे, तर जुबिन नौटियालने या गाण्याला आपला सुमधूर आवाज दिला आहे. हे गाणे टी- सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सोमवारी (१९ जुलै) प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला २४ तासांच्या आत ७७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अभिनेत्री प्रणिता सुभाष ‘हंगामा २’ आणि ‘भुज’ यांसारख्या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही आणि संजय दत्तही झळकणार आहेत.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाची कहाणी सन १९७१ मध्ये भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात अजय इंडियन एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन लीडर विजय कार्णिकच्या भूमिकेत आहे, जो त्यावेळी भुज विमानतळाचा प्रभारी होता. गावातील लोकांच्या मदतीने एअरफोर्स बेस तयार करण्याच्या या कहाणीतून प्रेक्षकांना सैनिकांच्या संकटांबाबत माहिती मिळेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जस्टिन बिबरचे चालते फिरते घर पाहिले का? दिग्गज कलाकारांच्या बंगल्यालाही टक्कर देईल त्याची आलिशान बस

-‘असं चोरी करणं बरोबर दिसतं का?’ शालूच्या लेटेस्ट व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट आली चर्चेत

-‘यू आर परफेक्ट’ गाण्यावर रुबीना दिलैकने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले इम्प्रेस


Leave A Reply

Your email address will not be published.