Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड अक्षय कुमारच्या नवीन गाण्याचा टिझर रिलीझ; डोळ्यात अश्रू घेऊन एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात लावले ठुमके

अक्षय कुमारच्या नवीन गाण्याचा टिझर रिलीझ; डोळ्यात अश्रू घेऊन एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात लावले ठुमके

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी स्वत: च्या हिमतीवर आपले एक स्थान निर्माण केले आहे. याच अभिनेत्यांमध्ये घेतले जाणार नाव म्हणजे अक्षय कुमार होय. अक्षय आज यशाच्या शिखरावर आहे. अशातच आता त्याच्या बहुप्रतिक्षित ‘फिलहाल २ मोहब्बत’ या म्युझिकल व्हिडिओची पहिली झलक समोर आली आहे. या नवीन गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यात अक्षयसोबत नुपुर सेनन दिसत आहे. (Superstar Akshay Kumar And Nupur Sanon Song Filhaal 2 Mohabbat Teaser Released)

अक्षयच्या या गाण्याला बी प्राकने आपला आवाज दिला आहे. या टिझरमध्ये अक्षय कुमार आपल्या पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच गर्लफ्रेंडच्या लग्नात डान्स करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान त्याच्या डोळ्यात अश्रूही दिसत आहेत. हा व्हिडिओ यापूर्वी दाखवलेल्या लव्हस्टोरीचा प्रिक्वल असल्याचे समजते. ‘फिलहाल २’मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे नुपुर सेननचा नवरीच्या वेशातील लूक.

हे गाणे देसी मेलोडीजच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला काहीच तासात १५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अक्षय आणि नुपुरची लव्हस्टोरी
‘फिलहाल’ या गाण्यात अभिनेत्री क्रिती सेननची बहीण नुपुर सेनन आणि अक्षयच्या जोडीला चांगली पसंती मिळाली होती. दुसरीकडे सन २०१९ मध्ये हा म्युझिक व्हिडिओ हिट झाल्यानंतर आता या गाण्याचा दुसरा पार्ट म्हणजेच ‘फिलहाल २’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवारी (३० जून) या बहुप्रतिक्षित गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षयच्या लव्हस्टोरीची सुरुवात पाहायला मिळत आहे. मात्र, ही कहाणी सुरू होताच, संपुष्टात आली आहे. कारण नुपुरचे लग्न होते. दुसरीकडे आपल्या प्रेयसीच्या लग्नात नाचून अक्षय आपले दु:ख व्यक्त करताना दिसत आहे.

 

येत्या ६ जुलैला होणार प्रदर्शित
या गाण्यात बी प्राकसोबत एमी विर्कचीही झलक पाहायला मिळत आहे. हे गाणे येत्या महिन्यात ६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचे लिरिसिस्ट आणि कंपोजर जानी आहेत. दुसरीकडे या गाण्याला बी प्राकने संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा