Monday, September 25, 2023

सेन्सॉर बोर्डाची कात्री अन् वादात अडकूनही ‘OMG 2’ने जिंकली प्रेक्षकांची मने, देशभरातून होतंय कौतुक

शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) अक्षय कुमार याचा बहुप्रतिक्षित ‘ओएमजी 2‘ सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला. रिलीजपूर्वी सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. एवढंच नाही, तर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावून आणि वादात अडकूनही या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी या सिनेमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात ओएमजी 2 बाबत ट्विटरवरील रिऍक्शन्स पाहून निर्माते आणि कलाकारांनाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाच्या कहाणीने समीक्षकांचीही मने जिंकली आहेत. काही समीक्षकांनी सिनेमाला 4 स्टार दिले आहेत. आता सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. प्रेक्षक या सिनेमाला ‘पैसा वसूल’ म्हणत आहेत. एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “मी आताच ओएमजी 2 सिनेमा पाहिला, जो मला खूपच आवडला. पंकज त्रिपाठी प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही चमकले. हा सिनेमा तुम्हाला सेक्स एज्युकेशनच्या मुद्द्यांवर एकजुट करेल आणि हे सामान्य बनवेल. हा खूपच मनोरंजक सिनेमा आहे.”

याव्यतिरिक्त एक व्हिडि व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची जोडी आवडल्याचे सांगताना दिसत आहे. ती महिला म्हणाली की, “खूप खूप मजा आली. मला पंकज त्रिपाठी आणि अक्षयची जोडी खूप आवडली. माझी इच्छा आहे की, त्यांनी आणखी 1-2 सिनेमे एकत्र करावे.” पुढे बोलताना महिला म्हणाली की, “त्यांनी जो विषय उचलला, सामान्यरीत्या लोकांना याविषयी बोलायला आवडत नाही. आई-वडिलांना मुलांसोबत बोलायला आवडत नाही, बहीण भावाला आपसात याविषयी बोलायला आवडत नाही. मात्र, यामुळे काय नुकसान होऊ शकते, त्याबाबत या सिनेमात दाखवले आहे.”

इतर युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘ओएमजी 2’ची कहाणी
कांती शरण मुद्गल शिवाच्या भक्ताच्या आयुष्यात वादळ तेव्हा येते, जेव्हा त्यांचा मुलगा सेक्स एज्युकेशनच्या कमी माहितीमुळे रुग्णालयात दाखल होतो. फक्त एवढंच नाही, तर शाळेत हस्तमैथून करताना त्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जातो. आता कांती शरण मुद्गल यांच्याकडे भगवान शिवाच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त इतर कोणताच मार्ग नसतो. तेव्हा काय काय घडतं, हे सिनेमात दाखवले आहे.

या सिनेमात अक्षय कुमार भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारत आहे, तर पंकज त्रिपाठी भोलेनाथचा भक्त बनले आहेत. या सिनेमात सेक्स एज्युकेशनचा मुद्दा उपस्थित केल्याने सिनेमाचे कौतुक केले जात आहे. तसेच, अक्षय आणि त्रिपाठींव्यतिरिक्त या सिनेमात यामी गौतम (Yami Gautam) हिचीदेखील मुख्य भूमिका आहे. (netizens impressed with akshay kumar pankaj tripathi and yami gautam film omg 2 know reviews)

महत्त्वाच्या बातम्या-
राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा! 2020मध्ये झालेल्या गर्भपाताविषयी म्हणाली, ‘5 महिन्यांच्या प्रेग्नंसी…’
दिशा पटानीनंतर टायगर पुन्हा दिशा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये? म्हणाला, ‘मी मागील 2 वर्षांपासून…’

हे देखील वाचा