अल्लू अर्जुनची कोरोनावर मात; १५ दिवसांनंतर घरी परतलेल्या वडिलांना पाहून मुलांनी धावत जाऊन मारली मिठी, व्हिडिओ पाहून येतील आनंदाश्रू


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने कोरोनाचा पराभव केला आहे. तो विलगीकरणात राहून कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर कुटुंबाला भेटत आहे. बुधवारी (१२ मे) अभिनेत्याने इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. त्याने एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने सांगितले की, तो कोविड निगेटिव्ह झाला आहे.

जेव्हा अभिनेता कोविड नेगेटिव्ह होऊन घरी आला, तेव्हा तो १५ दिवसांनंतर आपल्या मुलांना भेटला. यावेळी आपल्या वडिलांना पाहून मुलेही धावत आली आणि मिठी मारली. अभिनेत्याने आपल्या ट्विटरवर हा अतिशय गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या दोन मुलांवर प्रेम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान वाटेल, तसेच आनंदाश्रूही येतील.

अभिनेत्याने आज हा व्हिडिओ ट्वीट करत लिहिले आहे, “मी १५ दिवस विलगीकरण, आणि कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर कुटुंबाला भेटत आहे. मुलांना खूप मिस केले.” अभिनेत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाखों लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अल्लू अर्जुनने आज इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, त्याने कोरोना निगेटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनावर मात करण्याची चांगली बातमी सोशल मीडियावर शेअर करुन, त्याने चाहत्यांचे आभारही मानले आहे. अल्लू अर्जुनने लिहिले, “१५ दिवस विलगीकरणात राहिल्यावर कोरोना निगेटिव्ह आलो आहे. मी माझ्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानतो, ज्यांनी मी बरा होण्यासाठी प्रार्थना केली होती. मला आशा आहे की, हे लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी होईल, घरी राहा, सुरक्षित राहा, तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.”

भारतात कोरोना व्हायरसचा प्रचंड कहर सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात खळबळ उडाली आहे. छोट्या ते मोठ्या शहरांमधील लोक देखील कोरोना व्हायरस महामारीमुळे त्रस्त आहेत. या संसर्गामुळे छोट्या मुलांना आणि वृद्ध आपल्या जाळ्यात ओढले आहे. करमणूक उद्योगातील बर्‍याच लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. या कोरोनाने चित्रपट जगतातील बर्‍याच लोकांचे प्राणही घेतले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.