Thursday, June 13, 2024

…म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले रजनीकांत, स्वत:च केला खुलासा

सध्या देशभरात ‘थलायवा’ म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांच्या ‘जेलर‘ सिनेमाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे रजनीकांत यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. यामागील कारण म्हणजे, त्यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. दरम्यान रजनीकांत आदित्यनाथ यांच्या पाया पडले होते. खरं तर, रजनीकांत यांचे वय (72) आदित्यनाथ यांच्यापेक्षा (51) खूपच जास्त आहे. अशात त्यांच्या पाया पडणे चाहत्यांच्या घशाखाली उतरले नाही. आता मागील आठवड्यापासून सातत्याने ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या रजनीकांत यांनी याविषयी मौन तोडत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडण्यामागील कारणाचा खुलासाही केला आहे.

रजनीकांत मुख्यमंत्र्यांच्या पाया का पडले?
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रवास करत आहेत. त्यांचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. अशातच रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aditynath) यांच्या पाया पडल्यामुळे ट्रोल होत आहेत. अलीकडेच, रजनीकांत चेन्नई विमानतळावर स्पॉट झाले होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडण्यामागील कारणाविषयी विचारण्यात आले. यावर अभिनेते माध्यमांना म्हणाले की, “माझ्यापेक्षा लहान असले, तरीही योगी किंवा संन्याशांच्या पाया पडणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे माझी सवय आहे. मी फक्त हेच केले.”

राजकारणाविषयी बोलण्यास नकार
माध्यमांतील वृत्तांनुसार, यादरम्यान रजनीकांत यांनी त्यांच्या सिनेमाला मिळत असलेल्या शानदार यशासाठीही सर्वांना धन्यवाद दिला. तसेच, त्यांना यावेळी 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी म्हटले की, त्यांना राजकारणाविषयी कोणतीही चर्चा करायची नाहीये.

खरं तर, रजनीकांत यांनी उत्तर प्रदेश दौऱ्यावेळी ‘जेलर’ सिनेमाची खास स्क्रीनिंगही ठेवली होती. यामध्ये उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचाही समावेश होता. तसेच, आपल्या प्रवासादरम्यान त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती.

आता रजनीकांत यांनी मुख्यमंत्र्याच्या पाया पडण्यामागील कारणाचा खुलासा केल्यानंतर त्यांची ट्रोलिंग करणे बंद होते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (superstar rajinikanth breaks silence and explain why he touched up cm yogi adityanath)

महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच चित्रपटाने ‘या’ अभिनेत्रीला मिळालेली ओळख, पण पतीमुळे झाला करिअरचा सत्यानाश
‘या’ निर्मात्याने निकी तांबोळीला दिलेला त्रास, वाढदिवशी वाचा अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही रहस्य

हे देखील वाचा