Friday, March 29, 2024

सुपरस्टार रजनीकांत चेन्नईस्थित रुग्णालयात दाखल; नुकतेच ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने केले होते सन्मानित

सिनेविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते रजनीकांत चेन्नईतील कौवेरी रुग्णालयात दाखल झाले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेते रजनीकांत यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रजनीकांत यांना नुकतेच दिल्ली येथे ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.

“ही नियमितपणे केली जाणारी आरोग्य तपासणी आहे. ते आता तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात आहेत,” असे रजनीकांत यांचे प्रचारक रियाझ के अहमद यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. (Superstar Rajinikanth Hospitalised in Chennai for ‘Routine Checkup)

अभिनेते रजनीकांत दोन दिवसांपूर्वी प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी राजधानीत आले होते आणि त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) त्यांनी कुटुंबासोबत ‘अन्नाथे’च्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली. रजनीकांत आणि नयनतारा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अन्नाथे’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ स्वीकारताना रजनीकांत भावुक झाले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लोकांचे आभार मानले. “मी हा पुरस्कार माझे गुरू के बालचंदर सर यांना समर्पित करतो. मी त्यांची अत्यंत कृतज्ञतेने आठवण करतो आणि माझे भाऊ सत्यनारायण राव गायकवाड, जे माझ्या वडिलांसारखे आहेत, यांनी मला महान मूल्ये शिकवून मोठे केले,” असे रजनीकांत म्हणाले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ २५ ऑक्टोबर रोजी रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रजनीकांत त्यांचा जावई धनुषसोबत उपस्थित होते. धनुषला दिग्दर्शक वेत्रीमारन यांच्या २०१९ च्या क्राईम ड्रामा ‘असुरन’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

रजनीकांत यांनी आतापर्यंत ‘शिवाजी: द बॉस’, ‘दरबार’, ‘रोबोट’, ‘२.०’, ‘कबाली’, ‘काला’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

हे देखील वाचा