बापरे बाप! ‘भाईजान’च्या ‘या’ सिनेमाचे हक्क तब्बल २३५ कोटींमध्ये झी स्टुडिओच्या खिशात, ईदला होणार रिलीझ

Superstar Salman Khan Randeep Hooda Starrer Radhey Your Most Wanted Bhai Rights Sold For 235 Crore


बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सलमान अभिनित बहुप्रतिक्षित ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे सर्व हक्क कोट्यवधी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. यामध्ये वितरण, व्हिडिओ स्ट्रिमिंग  आणि संगीत अधिकारांचा देखील समावेश आहे.

 विशेष म्हणजे या सर्व हक्कांची रक्कम ही तब्बल २३५ कोटी रुपये इतकी आहे. हे सर्व हक्क झी स्टुडिओने घेतले असल्याचे वृत्त आहे.

ईद सणानिमित्त हा चित्रपट यावर्षी १४ मे रोजी रिलीझ होणार आहे. लॉकडाउननंतर सलमान खान हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणू शकेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट अगोदर चित्रपटगृहात रिलीझ होईल, त्यानंतर याचे प्रीमियर टीटी प्लॅटफॉर्म झी५ वर होईल.

खरं तर हा चित्रपट मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ईदच्या दिवशी रिलीझ होणार होता, परंतु चाहत्यांचा उत्साह पाहता याचे नवनवीन पोस्टर जारी केले जातील. सलमानला ईदवर चित्रपट रिलीझ करण्याची त्याची परंपरा या चित्रपटासोबत कायम राखायची आहे. ‘हा चित्रपट रिलीझ करून सलमानने चित्रपटांचा व्यवसाय परत आणण्यात मदत करावी,’ अशी विनंती चित्रपट वितरकांनी केली आहे. वितरकांच्या या मागणीला सलमानने आपली संमती दिली आहे.

थिएटर एक्झिबिटर असोसिएशनच्या आवाहनानंतर सलमानने ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीपासून मुक्त होणाऱ्या चित्रपटगृहांना ही मदत मिळू शकेल.

‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाईफ प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे.

या चित्रपटात सलमान खान आणि रणदीप हुड्डा आमने-सामने दिसणार आहेत. हे दोघे यापूर्वीही अनेक चित्रपटात एकत्र काम करताना दिसले आहेत. चित्रपटात खलनायक बनलेला रणदीप हुड्डा ड्रग माफियाची भूमिका साकारत आहे. यामध्ये तो सलमान खानला भिडताना दिसणार आहे. विशेष म्हणजे रणदीप गोव्यातील एका हिंसक आणि माथेफिरू माफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.