बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही झळकणार आहेत. या दरम्यान आता किंग खानच्या आणखी एका चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
असे वृत्त आहे की, ‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘राखी’ आहे. यासाठी त्याने बॉलिवूड सुपरस्टार संजू बाबा म्हणजेच संजय दत्तशी हात मिळवला आहे. (Superstar Shahrukh Khan And Sanjay Dutt Will Come Together For Film Rakhee)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संजय आणि शाहरुखची जोडी ‘राखी’ चित्रपटासाठी एकत्र येत आहे. या चित्रपटाची निर्माती कंपनी वायाकॉम १८ असेल. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये असेल. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा हे दोन्ही सुपरस्टार्स एकत्र पडद्यावर झळकतील. यापूर्वीही शाहरुखच्या ‘रावन’मध्ये संजय दत्तची छोटी भूमिका होती. याव्यतिरिक्त संजय ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुखसोबत दिसला होता.
माध्यमातील वृत्तानुसार, दोन्हीही अभिनेते सध्या चित्रपटाची शूटिंग मुंबईत करत आहेत. शाहरुख आणि संजयची ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप चांगला आहे. मात्र, मोठ्या पडद्यावर दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनी पाहिली नाही. अशामध्ये हा चित्रपट चाहत्यांसाठी कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर शाहरुख आपल्या पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे संजय दत्त चा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आणि नोरा फतेहीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…