Saturday, September 30, 2023

एका सिनेमासाठी घेते कोटी मानधन, पण फक्त 1600 रुपयांसाठी आईवर संतापलेली ‘ही’ अभिनेत्री, कारण धक्कादायक

आज बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या कलाकार आई-वडिलांच्या नावावर मोठे झाले आहेत. मात्र, काही कलाकार असेही होते, ज्यांनी आई-वडिलांच्या नावाचा अजिबात वापर न करता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या कलाकारांमध्ये सैफ अली खान याची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान हिच्या नावाचाही समावेश होतो. सारा शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) 28वा वाढदिवस साजरा करत आहे. साराने 2019मध्ये आलेल्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. सारा आपली आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत राहते. साराच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी खास किस्सा जाणून घेऊयात…

सारा अली खान (Sara Ali Khan) हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव बनले आहे. सारा एकापेक्षा एक सिनेमात काम करत आहे. एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेते. मात्र, एकदा ती काही रुपयांसाठी आई अमृता सिंग (Amruta Singh) हिच्याशी भांडली होती. त्यानंतर तिने आईला चांगलेच खवळले होते. साराने स्वत: हा किस्सा एका शोमध्ये सांगितला होता. यामागील कारणच असे होते, ज्याबाबत जाणून सर्वांना धक्का बसला होता.

विकी कौशल (Vicky Kaushal) याने साराशी संबंधित किस्सा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला होता. त्यानंतर साराने स्वत: आपल्या आईला ओरडण्यामागील कारणही सांगितले होते. खरं तर, सारा आणि विकी त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचले होते. शोमध्ये विकीने ही गोष्ट सांगताच, सर्वजण हैराण झाले होते.

काय म्हणाली होती सारा?
विकीने सांगितले की, “एक दिवशी मी पाहिले की, ही अमृता मॅमला ओरडत आहे. मी विचारले की, यार काय झालं? यावर ही म्हणते की, आईला अक्कल नाहीये. 1600 रपयांचा टॉवेल विकत घेऊन आली आहे.”

यानंतर साराने संपूर्ण प्रकरण समजावून सांगत म्हटले होते की, “व्हॅनिटी व्हॅनमध्ये फुकटचे 2-3 टॉवेल लटकवून ठेवतात हे रोज. त्यातून एक वापर. 1600 रुपयांचा टॉवेल कोण विकत घेतं?” तसं पाहिलं, तर साराकडे पैशांची कोणतीही कमी नाहीये, पण ती अनावश्यक खर्च टाळते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सारा एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेते. मात्र, ती खूपच साधे आयुष्य जगते.

साराच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती अखेरची ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) सिनेमात दिसली होती. यामध्ये तिने विकी कौशलसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. जवळपास 40 ते 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. या सिनेमाने जगभरात 116 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चाहते साराच्या आगामी सिनेमांची वाट पाहत आहेत. सारा ‘ऐ वतन मेरे वतन’, ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ आणि ‘मेट्रो… इन दिनो’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘दिग्दर्शन D ग्रेड, सिनेमा C ग्रेड; गटर 2…’, प्रसिद्ध अभिनेत्याने सनी देओलच्या सिनेमाला केले ट्रोल
मराठमोळी गायिका आनंदी जोशी अडकली लग्नाच्या बेडीत, गायकासोबतच थाटला संसार; पाहा फोटो

हे देखील वाचा