वाढदिवसाचे औचित्य साधून कंगनाने दिल्या सुशांतला शुभेच्छा, म्हणाली काश…


दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज हयात नसला तरी त्याच्या आठवणी कायम लोकांच्या स्मरणात राहतील. २०२० हे वर्ष सर्वांसाठीच धक्कादायक होते. यावर्षी अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला, मात्र सर्वात जास्त चटका लावून जाणारी घटना होती ती, सुशांत सिंग राजपूतचे निधन. सुशांतने १४ जून २०२० ला आत्महत्या करून या जगाचा शेवटचा निरोप घेतला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आजही जिवंत आहे. मृत्यूनंतर सुशांतचा आज पहिला वाढदिवस. त्यामुळे आज ‘सुशांत डे’ साजरा होत आहे तर ट्विटरवर ‘One day for SSR birthday’ ट्रेंड करत आहे.

आज सुशांतला त्याच्या फॅन्स सोबतच अनेक कलाकार देखील वाढदिवसाच्या निमित्ताने आठवत आहेत. कंगना राणावतने देखील ट्विट करत सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना त्याच्या समर्थानात पुढे आली होती. कंगनाने सुशांत मूवी माफियांचा शिकार झाल्याचे देखील सांगितले होते. आज सुशांतच्या वाढदिवशी तिने ट्विट करत तिला होत असणाऱ्या पश्चातापाबद्दल सांगितले आहे.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.

कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून ट्विट करताना सुशांतचे अनेक फोटो ट्विट करत लिहिले की, ” प्रिय सुशांत तुला मूवी माफियांनी खूप त्रास दिला, तू सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा मदतीसाठी सांगितले देखील होते. पण आज मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आहे की, मी त्यावेळी तुझ्यासोबत नव्हती. तेव्हा मी असा विचार केला की, तू मूवी माफियांसोबत लढण्यासाठी आणि त्रास सहन करण्यासाठी खूप मजबूत आहेस. काश मी तेव्हा असा विचार नसता केला. काश…हैप्पी बर्थडे डियर वन  #SushantDay”

यानंतर देखील कंगनाने एकपाठोपाठ एक ट्विट करत मूवी माफिया आणि इंडस्ट्रीमधल्या अनेक बड्या लोकांवर निशाणा साधला आहे. सोबतच तिने सुशांतच्या वाढदिवस जीवन आणि भरभरून साजरा करण्यासाठी लोकांना अपील केले आहे. कंगनाने नेहमीच सुशांत आणि सुशांतच्या कुटुंबाच्या सोबत उभे राहत त्यांना समर्थन दिले आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.