नुकतेच बहुप्रतिक्षित छावा या चित्रपटाचा दर्जेदार ट्रेलर रिलीज झालेला आहे या चित्रपटांमध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. यासोबतच बॉलीवूड आणि मराठीतील अनेक कलाकार देखील दिसणार आहेत. छावा या चित्रपटात मराठी अभिनेता सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. या चित्रपटात सुव्रतची कोणती भूमिका असणार आहे? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतु सुव्रतने छावा चित्रपटात विकी कौशलसोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केलेला आहे.
छावा चित्रपटाचा अनुभव सांगताना सुव्रत म्हणाला की, “छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य जगभरात माहिती व्हायल हवं. आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहासा लोकांना फारसा माहीत नाही. त्यांच्या कार्याची महती प्रेक्षकांना समजावी म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी यावर चित्रपट करायचा ठरवला. मी या चित्रपटाचा एक भाग आह, ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंद देणारी गोष्ट आहे. महाराजांच्या काळातील ऐतिहासिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती. आणि या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली आहे.”
यापुढे तो म्हणाला की, “लक्ष्मण सरांसारखा दिग्दर्शकांनी त्यांची काम करण्याची पद्धत खूपच कमालीची आहे. हिंदी मराठीत त्यांनी आज पर्यंत काम केलं आहे. ते उत्कृष्ट आहे. त्यांच्यासोबत काम करून मला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. विकी कौशल हा देखील कमालीचा अभिनेता आहे. सेटवर प्रचंड मेहनत करून त्याने ही भूमिका साकारली आहे. त्याच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.”
यापुढे सुव्रत म्हणाला की, “हा चित्रपट करताना प्रत्येक सेनेसाठी आम्ही सगळेच रिहर्सल करायचो. आणि प्रत्येक कलाकार त्याच्या सहकलाकाराच्या सीनसाठी क्लू द्यायला उभा राहायचा. मेकअप, कॉस्ट्यूम, आर्ट सगळ्या टीमने मेहनत करून हा चित्रपट बनवलेला आहे. रायगडचा सेट एकदा मांडला होता. तेव्हा सेटवर ऐतिहासिक वेशभूषेत सर्व कलाकार होते. त्यावेळी असं वाटलं की, आपण खरोखर हा सगळा काळ जगतोय आणि अनुभवतोय उन्हातानाची कपडेपटाची पर्वा न करता चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम काम केलं आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरात पोहोचावा ही माझी इच्छा आहे.” सुव्रत जोशी हा मराठीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
हिरव्या रंगाच्या शिमरी साडीमध्ये नोरा फतेहीचा हॉट लुक; सोशल मीडियावर रंगली चर्चा
रुग्णालयात दाखल होण्याची वृत्ते मोनाली ठाकूरने फेटाळली; सोशल मिडिया पोस्ट मध्ये लिहिले स्पष्ट…