भारीच ना! ‘समांतर २’ने रचला नवा इतिहास; ‘कुमार’ने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी


स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची ‘समांतर २’ ही वेब सिरीज प्रचंड गाजत आहे. कुमार आणि चक्रपाणी यांचे समांतर चालणारे जीवन आणि त्यातली रहस्य, एकंदरीत या सर्वांमुळे हा सीझन हिट ठरला आहे. ही सीझन नुकताच रिलीझ झाला आहे आणि सोबतच याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

विशेष म्हणजे, याच्या पहिल्या सीझन पेक्षा दुसरा सीझन अधिक हिट आणि लोकप्रिय ठरला आहे. आता या वेब सिरीजने एक नवा इतिहास रचला आहे. होय ‘समांतर २’ ही वेब सिरीज आतापर्यंत ओटीटी सर्वाधिक पाहिली गेलेली मराठी वेब सिरीज आहे. रिलीझ झाल्यापासून आतापर्यंत ५ कोटी ६० लाखाहून अधिक प्रेक्षकांनी ही सिरीज पाहिली आहे. (swapnil joshi post samantar 2 crosses 56 million views mx player)

कुमार अर्थातच अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच त्याने सर्वांचे मनापासून आभारही मानले आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, “समांतर २ने एमएक्स प्लेअरवर ५६ पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. सोबतच मोजणी चालू आहे. सर्व टीमचे अभिनंदन आणि प्रेक्षकांचे आभार.” स्वप्नीलच्या या पोस्टलाही खूप प्रेम मिळत आहे.

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या ‘समांतर’ या वेब सीरिजने चाहत्यांची मने जिंकली. सोबतच समीक्षकांची देखील वाहवा मिळवली. उत्तम स्टारकास्ट, रंजक वळणं सोबतच कलाकारांची केमिस्ट्री याने हा सीझन हिट ठरला. दुसरा सीझनही त्यापेक्षा अधिक हिट ठरत आहे. याचा पहिला भाग सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दुसरा भाग समीर विध्वंस दिग्दर्शित करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘उडण्यासाठी पंखांची गरजच काय?’, म्हणत ऋतुजा बागवे कडून ग्लॅमरस फोटो शेअर

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत वाजवलाय तिच्या अभिनयाचा डंका; वाचा तिचा जीवनप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.