Sunday, April 14, 2024

शाहरुख-आर्यन पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ‘या’ शोमध्ये बाप-लेक करणार राडा

बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खान त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत येत असतो. गेल्या काही दिवसांपुर्वी ‘पठान‘ चित्रपटात केलेल्या कामगीरीमुळे शाहरूख प्रचंड चर्चेत आला होता. शाहरूखचा मुलगा आर्यन खान  देखील सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. आता या बाप-लेकाची जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जाणून घेऊया ते कारण.

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (karan johar) सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या तो चर्चेत येण्याच कारण म्हणजे त्याने होस्ट केलेला ‘कॉफी विथ करण’ हा शो आहे. सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’ लवकरच त्याच्या आठव्या सीझनसह लोकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहे. यात नेहमीप्रमाणे वेगवेगळे स्टार दिसणार आहेत.

‘कॉफी विथ करण’च्या 8व्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या आणि शाहरूख (shahrukh khan) व आर्यन खानच्या (aryan khan) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या शोमध्ये शाहरूख आणि आर्यन एकत्र दिसणार आहेत. या पिता-पुत्राची जोडी ‘कॉफी विथ करण’मध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या शोमध्ये देशभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. जिथे करण जोहर त्याच्या हॉट आणि मसालेदार चॅट शोच्या नवीन सीझनसह परतण्यासाठी सज्ज झाला आहे. या आगोदर शाहरुख खान ‘कॉफी विथ करण’च्या  (koffee with karan ) 7 सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा सुरू होती. पण त्यावेळी तो दिसला नाही. कारण त्यावेळी शाहरूख त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होता.

‘कॉफी विथ करण शो’बद्दल बोलायचे तर, चॅट शोचा पहिला सीझन 2004 मध्ये रिलीज झाला होता. हा इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय चॅट शो आहे. जिथे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड करतात. सलमान खानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक स्टार्सने याच्या मागील सीझनमध्ये सहभाग घेतला आहे. ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये यश, ऋषभ शेट्टी आणि अल्लू अर्जुन यांसारखे संपूर्ण भारतातील स्टार्स असतील अशी अपेक्षा आहे. (actor shahrukh khan and aryan khan first time appear to koffee with karan season 8 hosted by karan johar)

अधिक वाचा-  
दुःखद! प्रसिद्ध हाॅलिवूड अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा
अभिनेत्री श्वेता तिवारीची बोल्ड अँड ब्यूटीफुल अदा; एकदा पाहाच

हे देखील वाचा