Tuesday, June 25, 2024

काय सांगता! लग्नानंतर ४ महिन्यातच स्वरा भास्कर प्रेग्नेंट?, ‘त्या’ ट्विटमुळे बातम्यांना ऊत

अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या विविध सोशल मीडिया पोस्टमुळे गाजत असते. काही दिवसांपूर्वीच स्वराने समाजवादी पक्षाचे नेता फहाद अहमद यांच्याशी लगीनगाठ बांधली. या लग्नानंतर ती सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिच्याबद्दल नेहमीच विविध बातम्या किंवा अफवा उठतच असतात. आता पुन्हा एकदा स्वरा एका बातमी अथवा अफवेमुळे चर्चेत आली आहे. स्वरा भास्कर प्रेग्नेंट असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/rajudasji99/status/1663999761647644681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1663999761647644681%7Ctwgr%5Eab0d375453d9ffcd6d5666ade88a40648c05a8d8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbollywood%2Frumours-about-actress-swara-bhaskar-that-she-became-a-mother-in-july-rnv-99-3694872%2F

अयोध्येमधील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी उपरोधाने एक ट्वीट केले आणि तिला तिला ट्रोल केले आहे. त्यांच्या या अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत स्वराचे अभिनंदन केले आहे. मात्र अनेकांना त्यांचे हे ट्विट आवडले नाही. तिची ही वैयक्तिक बाब आहे असे सांगत महंत राजुदास यांना सुनावत नाराजी व्यक्त केली. महंत राजुदास यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “स्वराने साडेचार महिन्यांनीच बाळाला जन्म देऊन वेळेच्या आधी काम पूर्ण करणाऱ्या गडकरीजींना आरसा दाखवला.”

दरम्यान स्वराने फेब्रुवारीमध्ये मोठ्या दणक्यात फहाद अहमदशी लगीनगाठ बांधली. याआधी जानेवारी महिन्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. फहद हा स्वरापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. दिल्लीमध्ये त्यांनी मोठ्या जल्लोषात बॉलिवूड स्टाइल लग्न केले. स्वराला या लग्नामुळे मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

 

हे देखील वाचा