Monday, May 27, 2024

अक्षया देवधरचा पारंपारिक साज! ‘पाठक बाईं’च्या गजऱ्यावर खिळल्या लाखो नजरा

‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर (पाठक वाई) आणि हार्दिक जोशी (राणा दा) यांना प्रचंड ओळख मिळाली. अक्षया यात बरीच साधी आणि सोज्वळ दाखवण्यात आली होती. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. याची झलक तुम्हाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळेलच. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय पाहून तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक भुरळ पाडणारा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे. (akshaya naik shared video see her south indian look)

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अक्षयाचा दक्षिण भारतीय अंदाज पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये अक्षयाने निळ्या रंगाची साडी, तर गुलाबी रंगाचे ब्लाउज परिधान केले आहे. सोबतच तिने जड दागिने घालून तिचा हा लूक पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे केसात माळलेल्या गजऱ्यावर लाखो नजरा खिळलेल्या पाहायला मिळाल्या.

हा व्हिडिओ अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यातील तिचा पारंपारिक साज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. यातील अभिनेत्रीची सुंदरता अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. अगदी कमी कालावधीतच या व्हिडिओवर ४४ हजारहून अधिक लाईक्स आले आहे. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत. अभिनेत्री शिवानी बावकरनेही या व्हिडिओवर ‘हाये’ अशी कमेंट केलेली पाहायला मिळाली.

अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच लाखो रसिकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पवनदीप राजनच्या आवाजाचे केले करिश्मा कपूरने कौतुक; परफॉर्मन्सच्या मध्येच पोहोचली स्टेजवर

-‘आज माझ्या ‘या’ पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण’, म्हणत सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा