‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दारू पिऊन ‘बाघा’ने घातला राडा; केली थेट शाहरुख खानची मिमिक्री


टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ होय. दैनंदिन जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून हा शो प्रेक्षक आनंदाने पाहत असतात. या शोच्या आगामी भागात चांगलाच ड्रामा पाहायला मिळणार आहे.

एका रेस्टॉरंटमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये गोकुळधाम सोसायटीमधील सगळे सदस्य जातात. तिथे पुरुष मंडळींनी कोल्ड ड्रिंकच्या एका मोठ्या बाटलीमध्ये दारू ठेवली होती.

सगळे पुरुष नंतर हे सगळं एन्जॉय करणार होते. पण तेवढ्यात बाघाने चीली पनीर खाल्ले. त्याला खूप तिखट लागल्यामुळे त्याने गडबडीत कोल्ड ड्रिंक ऐवजी त्या बाटलीमध्ये ठेवलेली सगळी दारू पिऊन टाकली. त्याला त्या दारूची नशा चढली आणि तो म्युझिक शिवाय डान्स करायला लागला. जेव्हा जेठालाल, मेहता, बापू जी आणि इतर लोक जेव्हा या मागील कारण शोधण्यास गेले, तेव्हा ही वेगळीच परिस्थिती त्यांच्यासमोर आली. (Taarak Mehta ka ooltah chashma bagha drunk dance in crazy mode Jethalal went confused)

सगळ्यात आधी बाघा यासाठी खूप भावुक होतो की, सगळेजण त्याला डान्स फ्लोरवरून रूममध्ये जाण्यास सांगत होते. यानंतर तो सुपरस्टार शाहरुख खानची मिमिक्री करून बोलतो. शाहरुख खानचे भूत त्याच्यावर एवढे चढले होते की, तो त्याच्या आवाजात सगळे काही बोलू लागला. एवढंच काय, तर तो बोटाने गालावर डिंपल पाडत होता.

बाघाची ही अवस्था पाहून गोगी व्हिडिओ काढू लागला, तेव्हा जेठालालने त्याला थांबवले. बाघा नशेमध्ये एवढा तल्लीन होता की, तो बापूजींची एक गोष्ट ऐकण्यासाठी देखील तयार नव्हता. यानंतर गोकुलधाम सोसायटीमधील लोकांनी कशाप्रकारे त्याला कंट्रोल केले आणि कशाप्रकारे ही परिस्थिती सांभाळली हे पाहण्यासाठी आता तुम्हाला पुढचा एपिसोड पाहावा लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर

काय सांगता! ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन? सलमान खानने दिली हिंट

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला


Leave A Reply

Your email address will not be published.