Monday, April 20, 2026
Home अन्य ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेला १३ वर्ष पूर्ण; सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेला १३ वर्ष पूर्ण; सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस

कधी कधी टीव्हीवर असे शो सुरु होतात, जे इतिहासात कधीतरीच बनतात. अशा शोमुळे कलाकारांसोबतच चॅनेलला देखील एक नवीन ओळख मिळते. टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील स्पर्धा बघता इथे जर प्रेक्षकांना मालिकांमधून काहीच नावीन्य मिळाले नाही, तर प्रेक्षक तुमच्या कलाकृतीकडे साफ पाठ फिरवतात. मात्र टेलिव्हिजन क्षेत्राची सर्व समीकरण बदलवणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या काही मालिका बऱ्याच वर्षात एकदाच तयार होतात आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशीच एक मालिका १३ वर्षांपूर्वी सुरु झाली आणि बघता बघता या मालिकेने लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे झेंडे गाडले. ही मालिका आहे अद्भुत आणि अद्वितीय अशी ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ या मालिकेने आणि मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मागच्या १३ वर्षांपासून या मालिकेने आणि गोकुळधाममध्ये सोसायटीतील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले. आजच्याच दिवशी १३ वर्षांपूर्वी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. (Taarak mehta ka ooltah chashmah completes 13 years)

https://www.instagram.com/p/CR3Sq08jUJ2/?utm_source=ig_web_copy_link

या शोच्या लोकप्रियतेचे किस्से इतके आहेत की, फिल्म इंडस्ट्रीमधल्या मोठमोठ्या कलाकाराला इथे यावे लागले. या १३ वर्षांमध्ये मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवली, खूप पुरस्कार मिळवले, अनेक कलाकार आले गेले. मात्र लोकप्रियता टिकवण्यात मालिका यशस्वी ठरली. आज मालिकेला पूर्ण झालेल्या १३ वर्षांच्या निमित्ताने या मालिकेवर आधारित अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. या मिम्समधून प्रेक्षकांनी मालिकेला, आणि संपूर्ण टीमला त्यांचे मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद म्हटले आहे.

या मालिकेचे निर्माता असणाऱ्या असित कुमार मोदी यांनी या आभाळाएवढ्या यशाबद्दल सांगितले की, “तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आज चौदाव्या वर्षात पदार्पण करत आहे. आम्ही सर्व प्रेक्षकांचे या एवढ्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करतो. येणाऱ्या वर्षांमध्ये देखील आम्ही तुमचे असेच मनोरंजन करू हे वचन देतो.”

मालिकेच्या सेटवर देखील या एवढ्या मोठ्या यशाचे मोठे सेलिब्रेशन झाले. याचे देखील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

-प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर

हे देखील वाचा