‘तारक मेहता’ फेम ‘या’ बोल्ड अभिनेत्रीची कंबर फोटो पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटं


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta ka ooltah chashma) शोला प्रेक्षक नेहमीच खूप पसंती देतात. गेल्या १३ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची अभिनेत्री आराधना शर्मा  (Aradhana Sharma)  सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे भान हरपत असते. दरम्यान, आराधनाचे काही फोटो सोशल इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना त्यांचे हृदय सांभाळणे कठीण जाईल.

हे फोटो आराधनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून, या फोटोंमध्ये आराधना आरशासमोर उभी राहून सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचे ब्रालेट घातले असून, त्यावर करड्या रंगाची ट्रॅक पँट घातली आहे. आराधनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिचा कमनीय बांधा आणि तिचे टॅटू सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आराधना शर्माच्या या बोल्ड स्टाईलमुळे आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. युजर्स कमेंट करून आराधनाची आणि तिच्या फिगरची स्तुती करत असून, तिचे या फोटोंना प्रचंड लाईक्स, कमेंट्स तर येत आहेत. यासोबतच तिचे फोटो मोठ्याप्रमाणावर शेअर केले जात आहेत. चाहते त्यावर हार्ट आणि फायर इमोजी कमेंट्समध्ये पोस्ट करत आहेत.

अभिनेत्रीने केले आहे ब्रेकअप सेक्स

आराधनाने खुलासा केला होता की, तिने ब्रेकअप सेक्स केला आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती ज्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती, त्याच्यासोबतच तिने ब्रेकअप सेक्स करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा त्यांचे नाते तुटणार होते. त्यानंतर तो म्हणाला की, आपण एकमेकांना शेवटच्या वेळी अनुभवू या, आणि हाच विचार करून त्यांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले होते.

विशेष म्हणजे आराधना शर्मा ‘स्पिलिट्सविला’ या रियॅलिटी शोच्या १२ व्या सीझनमध्येही दिसली आहे. या शोमधील तिचे काम सर्वानाच खूप आवडले होते. आराधना शर्मा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ती अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती डीप नेक वन पीस ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतो.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!