Sunday, June 23, 2024

TMKOC: खऱ्या आयुष्यातही बबिता जीला डेट करू इच्छितो जेठालाल? पाहा काय म्हणाले दिलीप जोशी

टेलिव्हिजनवर प्रदीर्घ काळ चालणाऱ्या कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आपण दररोज नवनवीन कथा पाहतो. त्यात नेहमीपासून आपण पाहत आलो आहोत की, जेठालाल (दिलीप जोशी) आपल्या शेजारी राहणाऱ्या बबिता जीला (मुनमुन दत्ता) इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे बबिताचा पती कृष्णन अय्यर (तनुज महाशब्दे) नेहमी रागावताना दिसतो. पण आता आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये जेठालालने बबिताला डेट करण्याबाबत उत्तर दिले आहे.

बबिता जीला डेट करू इच्छितो जेठालाल?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिलीप जोशी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. यावेळी त्यांना विचारण्यात येते की, बबिता जीला डेट करण्याबद्दल तुमचे काय मत आहे? तर दिलीप या प्रश्नावर अतिशय सभ्यपणे हसतात आणि म्हणतात, “जेठालालबद्दल सांगता येत नाही, पण दिलीप जोशीला हे करायचे नाही.” यानंतर त्यांनी असेही सांगितले की, ते एक आनंदी विवाहित व्यक्ती आहे. (taarak mehtas jethalal wants to date babita ji in real life too actor gave this answer watch video)

चाहत्यांना भावते बबिता- जेठालालची केमिस्ट्री
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील टप्पू सेनेनंतर जर काही प्रसिद्ध असेल, तर ती जेठालाल आणि बबिताची मैत्री आहे, हे आपल्याला माहित आहे. जेठालाल बबिताला पहिल्यापासून पसंत करतो. इतकेच नव्हे, तर तो नेहमीच बबितासोबत वेळ घालवण्याची संधी शोधत असतो.

पूर्ण झाले आहेत ३३०० भाग
विशेष गोष्ट म्हणजे, या सिटकॉमने आतापर्यंत ३३०० एपिसोड पूर्ण केले आहेत. हा शो गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे. गोकुळधाम सोसायटीतील कुटुंबांची कहाणी शोमध्ये दाखवण्यात आली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये दररोज एक नवीन समस्या येते, जी सर्वजण मिळून सोडवतात. पण या संपूर्ण मालिकेत हशा मात्र कायम आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा