तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सतत विविध नकारात्मक कारणांमुळे मधल्या काळात तुफान गाजली. अनेक कलाकार शो सोडून जात आहे. मात्र काही कलाकारांच्या जाण्यामुळे आणि निर्माते, दिग्दर्शकांवरील आरोपांमुळे मालिकेला खूपच नकारात्मकता मिळाली. या सर्वांमध्ये मालिकेत रोशन सिंग सोढी अर्थात अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने मालिका अचानक सोडली आणि त्याचे कारण तिने तिचे सेटवर झालेले लैंगिक शोषण असे दिले आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर मालिकेत रिटा रिपोर्टर साकारणाऱ्या प्रिया आहुजाने देखील निर्मात्यांवर अनेक आरोप केले. त्यामुळे या दोघी कमालीच्या गाजल्या.
View this post on Instagram
मात्र आता प्रिया आहूजा आणि जेनिफर मिस्त्री या दोघी एका नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. नुकताच प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघी लावणी करताना दिसत आहे. दोघींचा मराठी लूक कमालीचा व्हायरल झाला असून, तो खूपच गाजत देखील आहे. या लूकमध्ये त्या खूपच स्टायलिश दिसत आहे.
प्रियाने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “आणि आम्ही एकत्र आलो आहोत. खात्री खूपच मस्त आणि उत्साहवर्धक येणार आहे. तुम्हाला काही कल्पना आहे का? फक्त थोडी वाट पाहा”. यात तिने कुठेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. मात्र अनेकांनी त्यांच्या लूक पाहून त्या कोणत्यातरी डान्स शोमध्ये दिसणार असल्याचे लिहिले आहे, तर काहींनी त्यांचा नवीन शो येत असल्याचे म्हटले आहे.
अधिक वाचा-
प्रियांकावर आली होती तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवण्याची वेळ, जाणून घ्या काय होतं कारण?