Saturday, June 29, 2024

‘प्रत्येक घरातली माता भगिनी…’, म्हणत मराठमोळ्या प्राजक्ता माळीने शेअर केला ‘पावनखिंड’ चित्रपटाचा टिझर

उत्कृष्ठ सुत्रसंचालिका, अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून लोकप्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) होय. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. ती प्रत्येक भूमिका अतिशय चोखपणे साकारत असते. म्हणूनच ती आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. अभिनेत्री आता चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा चांगलाच डंका वाजवत आहे. तिचा लवकरच मराठी चित्रपट ‘पावनखिंड’ येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या टिझरचा व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जो आता सर्वत्र धमाल करत आहे. हा टिझर ४४ सेकंदाचा आहे. टिझर शेअर करत प्राजक्ताने खास कॅप्शन देखील दिले आहे.

प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्वराज्य साकार होत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराने स्वराज्यासाठी स्वतःचा जीव कवडीमोल मानला. त्या साऱ्याच मावळ्यांच्या माघारी प्रत्येक घरातली माता भगिनी एक एक क्षण त्यांच्यासाठी लढत होती. त्या साऱ्यांनाच समर्पित आहे पावनखिंडचा टीजर स्वराज्याच्या वीरांगना. पावनखिंड २१ जाने.”

‘पावनखिंड’ हा चित्रपट ऐतिहासिक आहे. टिझरमध्ये दिसत आहे की, स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रत्येकजण आपल्या जीवाची बाजी लावत आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी केवळ मावळेच नाही, तर त्यांच्या घरातील माता आणि भगिनी देखील क्षणोक्षणी परिस्थितीशी लढत होत्या, हे या टिझरमधून दिसत आहे.

प्राजक्ता माळीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने झी मराठी या वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या भोळ्या आणि सालस स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याबरोबर तिने ‘खो-खो’ या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा