Thursday, July 31, 2025
Home मराठी मराठी अभिनेत्रींना बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीने दिले चोख उत्तर; म्हणाली, ‘बिकिनी नाही घालणार…’

मराठी अभिनेत्रींना बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीने दिले चोख उत्तर; म्हणाली, ‘बिकिनी नाही घालणार…’

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर ट्रोलिंग थांबवण्यासाठी एक नवीन उपाय सुचवला आहे. तिच्या मते, सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर आता पैसे आकारले पाहिजेत. प्रत्येक कमेंटसाठी कमीत कमी दहा रुपये जरी आकारले तरीही, लोक असले प्रकार करणार नाहीत आणि कमेंट्सचं एकंदरीत स्वरुप बदलेल.

तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) नवरात्रीनिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घातल्यावर किंवा बिकिनीमधील फोटो शेअर केलेल्या त्यांना मराठी अस्मितेवरून ट्रोल केलं जातं. तिच्या मते, हे एक वाईट प्रकार आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तेजस्विनी म्हणाली, “जर माझं शरीर चांगलं आहे…मला एखादे कपडे आवडतात आणि ते मी घातले यात काहीच गैर नाहीये. बरं स्विमिंग पूलमध्ये बिकिनी नाही घालणार, तर कुठे घालणार? त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचंय? की, लोकांना काय वाटतं म्हणून जगायचंय हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल.”

तिने पुढे म्हणाली, “स्वत:च्या मताप्रमाणे जगायचं ठरवलं की, बिकिनी घालून फोटो टाकल्यावर खालच्या कमेंट्स वाचायच्या नाहीत. त्या फोटोंवरुन कोणी ट्रोल केलं तरीही फरक पडता कामा नये. जर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला जमत नसेल, तर लोकांना हवं तसं वागावं लागतं.”

 तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या इतर समस्यांवरही भाष्य केले. तिने सांगितले की, लोकांना एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं ही एक मोठी समस्या आहे. तिने सांगितले की, तिच्या अनेक मैत्रिणींनी मुलं होऊ द्यायची नाहीत असा निर्णय घेतला आहे. यावर अनेक लोकांनी खूपच वाईट कमेंट्स केल्या होत्या. तेजस्विनी पंडितच्या या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. अनेक लोक तिच्या मताशी सहमत आहेत. तर काही लोकांनी तिच्या मताला काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. (Tejaswini Pandit gave a befitting reply to the trolls trolling Marathi actresses in bikinis)

आधिक वाचा-
४८ वय असूनही गजब दिसते मलायका अरोरा, जाणून घ्या तिचे फिटेनस सिक्रेट
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने 5 वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास

हे देखील वाचा