Sunday, September 8, 2024
Home अन्य ‘लोक तुमचा वापर करतात’; हिना खानची भावनिक पोस्ट, बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअपच्या चर्चा…

‘लोक तुमचा वापर करतात’; हिना खानची भावनिक पोस्ट, बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअपच्या चर्चा…

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील एका वाईट टप्प्यातून जात आहे. खरं तर हिना ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. ज्याची माहिती तीने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना दिली होती. पण दरम्यान, हिनाने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत ब्रेकअप केल्याचीही बातमी समोर येत आहे. आता हिनाची ताजी पोस्ट देखील या गोष्टीचे संकेत देत आहे.

नुकतीच हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून आता सर्वजण अंदाज लावत आहेत की तिने तिचा प्रियकर रॉकीसोबत ब्रेकअप केले आहे. हिना खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जर मी आयुष्यात काही शिकले असेल तर ते हे की जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्हाला कधीच सोडत नाहीत. “जे लोक सोडतात ते तुमचा वापर करत करतात.”

हिनाची ही पोस्ट पाहून आता तिचे चाहतेही हैराण आणि नाराज झाले आहेत. अभिनेत्रीच्या या कठीण काळात तिचा प्रियकर रॉकी जैस्वाल तिला सोडून गेला आहे, असं सगळ्यांनाच वाटत आहे. मात्र, हिनाने पोस्टमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही किंवा रॉकीची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

ही पहिलीच वेळ नसली तरी. याआधीही हिना आणि रॉकीच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यानंतर रॉकीने त्याच्या इंस्टाग्रामवर हिनाचे काही फोटो शेअर केले आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

हिना खान आणि रॉकी जैस्वाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची भेट हिनाच्या पहिल्या शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर झाली होती. इथून दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –    

प्रसादने सांगितला घर खरेदी करण्याचा किस्सा; बायकोचं २५ वर्षांचं स्वप्न होतं…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा