Friday, December 8, 2023

आनंदवार्ता! गायिका मुग्धा वैशंपायनने शेअर केली लेटेस्ट पोस्ट; म्हणाली, “सांगताना अत्यंत आनंद होतोय की…”

सोशल मीडिया आणि कलाकर यांच खूप जवळच नात आहे. कलाकार आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी शेअर करण्यातचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात. चाहते देखील कलाकारांच्या पोस्टवर खूप रंजक अशा कमेंंट करत असतात. त्यामुळे अनेकदा कलारकार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतीच गायिका मुग्धा वैशंपायन हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

मुग्धा (Mugdha Vaishampaya) बारा वर्षांपुर्वी ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावर दिसली होती. तिने आतापर्यंत अनेक गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. हे सर्व करत असताना तिने तिचे शिक्षणही तितक्याच चिकाटीने केले आहे. मुग्धाने अभ्यास, गाण्याचा कार्यक्रम, गाण्याचा रियाज हे सगळ एकाच वेळी सांभाळले आहे. इतकच नाही तर तिने यातवेळी M.A in Music मिळवली आहे. पदवी मिळवल्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट शेअर करताना तिने लिहीले की, आज मी खूप आनंदी आहे. कारण मला मुंबई युनिव्हर्सिटीतून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात गोल्ड मेडल मिळाले आहे. मी मास्टर डिग्रीमध्ये 86% मिळवले आहेत. आता माझी डिग्री पुर्ण झाली आहे. याचे पुर्ण श्रेय माझ्या गुरु विदुषी शुभदा पराडकर यांना जातं. याचबरोबर मला मार्गदर्शन केल्याबद्दल माझ्या एम.एच्या गाईड डॉक्टर अनया थत्ते यांचे मनापासून खूप खूर आभार.”

पोस्ट शेअर करत मुग्धाने मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत. त्यामुळे हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्ट शेअर करताना तिने गुरु विदुषी शुभदा पराडकर आणि तिच्या एम.एच्या गाईड डॉ. अनाया थत्ते यांच्यासोबतचे फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिच अभिनंदन करत आहेत. सध्या मुग्धाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक केले जात आहे. (Singer Mugdha Vaishampayana shared the latest post)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल
नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

 

हे देखील वाचा