Wednesday, July 3, 2024

बिग बॉसपूर्वीच शिवने जिंकले होते सलमान खानचे मन, म्हणून मिळालं…

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ सध्या खूपच जास्त धमाल करत आहेत. यामध्ये शालिन भनोट याचा चिकनसाठीचा हट्ट आणि अर्चना गौतम आणि गोरी नागोरी यांच्या भांडणाने तर बिग बॉसच्या घराचा चांदनं लावलं आहे. मात्र, पण पूर्ण घरामध्ये प्रेक्षकांचे मनं जिंकण्यसाठी अब्दु रोजिक आणि मराठी मुलगा शिव ठाकरे यांनाच यश मिळालं. प्रेक्षकांवर भुरळ घालणारे हे दोन स्पर्धक ठरले आहेत. त्यांना चांगलीच लोप्रियता मिळाली आहे.

मराठी मुलगा शिव ठाकरे (Shiv Thackeray) हा मराठी ‘बिग बस2’ चा विजेता ठरल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचा लाडका स्पर्धक बनला आहे. सध्या तो हिंदी बिग बॉसमध्ये आपल्या दमदार खेळाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तो प्रेक्षकांसोबतच सुत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) याचाही आवडता स्पर्धक बनलाय.

सलमान खान शिवला बिग बॉस 16 मध्ये येण्यापूर्वीच त्याला फॉलो करत होता. त्याशिवाय सध्या सोशल मीडियावर सलमान आणि शिवचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे दोघे कार्यक्रमापूर्वीच भेटले होते. सलमानने मराठी ‘बिग बॉस2’ मध्ये भेट दिली होती तेव्हा स्वत: महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी शिवची ओळख सलमानसोबत करुन दिली होती. तेव्हा या भागाची क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मांजरेकर म्हणतात की, “हा शिव ठाकरे. ‘रोडीज’ खेळून आलाय. तेव्हा सलमान म्हणतो की, “अरे हा तर एकदम तरबेज मानूस आहे. हा प्रत्येक सिजन पाहतो आणि त्याला माहित आहे कसं खेळायचं. तो गावाकडचा प्रेमळ माणूस आहे. रोडीज खेळल्यानंतरही तो तसाच आहे का?” असं विचारल्यानंतर  शिव “हो” असं उत्तर देतो.

शिवच्या अशा उत्तराने सलमानचे मन जिंकले आणि सध्या तो ‘बिग बॉस16’ चा भाग बनलाय. त्याने आपल्या दमदारे खेळीने सलमानचे मन तर जिंकलेच शिवाय त्याने घरामध्ये कॅप्टनसी देखिल मिळवली. अशाप्रकारे शिवचा हिंदी बिगस बॉसमध्ये येण्याचा प्रवास होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडन हिच्या मोहक अदा, पाहा फोटो
अती घाई संकटात जाई! इमरजेंसी चित्रपटाच्या सेटवर कंगनाचा घरला पाय अन्…

हे देखील वाचा