Saturday, March 2, 2024

वेगवेगळ्या पात्रांसाठी स्वतःला अपडेट ठेवतो शाहिद कपूर, इतर अभिनेत्यांशी तुलना करत लूकबाबत केले मोठे विधान

शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि क्रिती सेननचा (Kriti senon) ‘तेरी बातों में उल्झा जिया’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांनी हा अभिनेता त्याच्या रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे. शाहिदचे रोमँटिक ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या चित्रपटाला सोशल मीडियावर समीक्षक आणि प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. शाहिदने अलीकडेच एका संवादादरम्यान त्याच्या लूक्सबद्दल सांगितले. यासोबत त्याने सांगितले की त्याला त्याचा लुक बदलायला आवडते.

शाहिद म्हणाला, “मी एक अभिनेता आहे. माझ्या चाहत्यांना माझ्याकडून अपेक्षित असलेली भूमिका साकारण्यासाठी मी येथे आहे. असे काही कलाकार आहेत जे स्वतःवर खूप प्रेम करतात. त्यांनी कोणतीही भूमिका केली तरी त्यांना तेच दिसायला आवडते. मी त्या लोकांपैकी नाही. मला स्वतःला बदलायला आवडते.”

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. क्रितीने सिफ्रा या रोबोटची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात एक सुंदर आणि अशक्य प्रेमकथा दाखवतो. या चित्रपटात क्रिती सेनन आणि शाहिद कपूर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रही दिसत आहेत.

शाहिदच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर तो ‘देवा’ चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती, ज्याचा फर्स्ट लुकही त्याने शेअर केला होता. या चित्रपटात शाहिद पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. फर्स्ट लूकमध्ये शाहिद हातात बंदूक धरलेला दिसत होता. त्याचवेळी शाहिदने सांगितले की, त्याचा चित्रपट दसरा 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘देवा’मध्ये शाहिदसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘सीतारे जमीन पर’मधून परतणार आमि खान ; म्हणाला, ‘हा चित्रपट तुम्हाला सामाजिक संदेश देईल’
करीना-सैफचा मुलगा तैमूर अभिनयापासून राहणार दूर? या गोष्टीत आहे इंटरेस्ट

हे देखील वाचा