सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रिम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेन्नई पोलिसांनी याबाबत माहिती दिली होती. पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही बातमी समोर आल्यानंतर रजनीकांतचे चाहते चिंतेत आहेत आणि त्यांच्या तब्येतीचे अपडेट जाणून घेऊ इच्छित आहेत. रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
रजनीकांत यांच्या पत्नीने सांगितले की, अभिनेता आता पूर्वीपेक्षा चांगला आहे. ते धोक्याबाहेर आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना लता रजनीकांत म्हणाल्या, ‘सगळं ठीक आहे’. सुपरस्टारची पत्नी यापेक्षा जास्त काही बोलली नाही. मात्र, ‘सगळं ठीक आहे’ या विधानानंतर चिंताग्रस्त चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून सुपरस्टारसाठी ते सतत प्रार्थना करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोटदुखीच्या तक्रारीनंतर अभिनेत्याला दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी, त्याच्यावर यशस्वीरित्या वैद्यकीय प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये त्याच्या खालच्या पोटाजवळ स्टेंट ठेवण्यात आला. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया पूर्ण केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढील दोन-तीन दिवस अभिनेत्याला रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
76 वर्षीय रजनीकांत सध्या त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यापैकी एक म्हणजे दिग्दर्शक ज्ञानवेल राजा यांचा वेट्टैयान, जो १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय लोकेश कनगराज यांचा कुली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या कारणामुळे शाहरुख खान राहत नाही अपार्टमेंट मध्ये; करण जोहरच्या प्रश्नावर दिले दमदार उत्तर…