Monday, July 1, 2024

तू शुबनला डेट करते?; हसत हसत सारा म्हणाली, ‘सारा का सारा दुनिया…’

सारा अली खानचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत अनेक दिवसांपासून जोडले जात आहे. डिनर डेटवर एकत्र दिसल्यानंतर दोघांमध्ये डेटिंगच्या अफवा पसरल्या. पण यावर दोघांनीही काहीही वक्तव्य केलेले नाही. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण’च्या आगामी भागात दिसणार आहेत.

यावेळी, दोन्ही अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित मनोरंजक खुलासे देखील करणार आहेत. आता अलीकडेच शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सारा अली खानने (Sara Ali Khan) शुबमन गिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले आहे. ‘कॉफी विथ करण’च्या आगामी एपिसोडच्या नवीन प्रोमोमध्ये करण जोहरने साराला शुबमनसोबतच्या तिच्या डेटिंगच्या अफवांवर विचारले.

या व्हिडिओमध्ये करण साराला विचारताना दिसत आहे की, तुझ्या आणि शुबमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप अफवा आहेत? ज्याच्या उत्तरात अभिनेत्रीसारा म्हणते की, “सारा का सारा.. दुनिया गलत सारा के पीछे पडा है.” … त्यानंतर अभिनेत्री हसत हसते. हे ऐकून करण आणि अनन्या हसायला लागतात. अलीकडेच सारा तेंडुलकर आयसीसीच्या एका मॅचमध्ये शुबमन गिलला चिअर करताना दिसली होती. क्रिकेटरच्या अर्धशतकावर साराने स्टँडिंग ओव्हेशन दिले. साराने दिलेल्या उत्तरावरून नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

शुबमन गिलचे नाव क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही जोडले जात आहे. शुबमन सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची माहिती आहे. यापूर्वी, जेव्हा सारा अली खानला विचारण्यात आले की ती तिची आजी शर्मिला टागोर सारख्या क्रिकेटपटूशी लग्न करण्यास तयार आहे का? तेव्हा तिने खुलासा केला की, कोणत्याही व्यवसायाचा तिच्या विचारांवर प्रभाव पडत नाही. तो कोणीही असू शकतो, मग तो क्रिकेट असो, व्यापारी असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो. (The actress responded to Indian cricketer Shubman Gill and Sara dating rumours)

आधिक वाचा-
‘चित्रपट गाजला तर नाव मिळते, मालिका चालली तर पैसा आणि नाटक…’ मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव
रश्मिकाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क; अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची केली मागणी

हे देखील वाचा