Monday, May 27, 2024

रश्मिकाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क; अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची केली मागणी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्केटमध्ये आल्यानंतर लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. आमच्या सोयीसाठी तयार केलेल्या साधनांचा लोक गैरवापर करत आहेत. दरम्यान, भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो सोशल मीडियावर आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. वास्तविक, हा व्हिडिओ डीपफेकच्या मदतीने बनवला गेला आहे आणि अभिनेत्रीचा चेहरा दुसऱ्याच्या व्हिडिओवर लावला गेला आहे.

डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. ज्यामध्ये एआय टूल वापरून फोटो किंवा व्हिडिओमधील व्यक्ती दुसऱ्याच्या फोटोने बदलली जाते. एआयच्या क्षमतेमुळे, सामान्य नागरिकाला बनावट व्हिडिओ ओळखणे कठीण होते आणि तो सहजपणे जाळ्यात अडकतो. भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandana) हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री लिफ्टच्या आत येताना दिसत आहे ज्यामध्ये ती बोल्ड स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अशी आहे की, हा व्हिडिओ 8 ऑक्टोबर रोजी झारा पटेल नावाच्या महिलेने इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये झारा पटेलच्या शरीराचा वापर करून डीपफेकच्या मदतीने रश्मिका मंदान्नाचा चेहरा सुपरइम्पोज करण्यात आला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी काळजी व्यक्त करत या व्हिडिओवर कायदेशीर कारवाईची मागणीही केली आहे.

 तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर, व्हिडिओमध्ये झारा पटेल लिफ्टमध्ये प्रवेश करताच, तिचा चेहरा अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या रुपात बदलताना दिसेल .हा व्हिडिओ बनावट आहे आणि तो एआय टूलच्या मदतीने बनविला गेला आहे. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून ही एक भक्कम कायदेशीर केस असून अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी असे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट करताना लिहिले की,’कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे.’ त्यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट आल्या आहेत. (Amitabh Bachchan demanded legal action in case of Rashmika Mandana offensive fake video viral)

आधिक वाचा-
नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!
‘चित्रपट गाजला तर नाव मिळते, मालिका चालली तर पैसा आणि नाटक…’ मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव

हे देखील वाचा