Saturday, June 29, 2024

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने

बहुप्रतिक्षित ओटीटी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द आर्चीज‘चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे यात बी-टाऊनचे प्रसिद्ध स्टार किड्स दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नेटफ्लिक्सने रविवारी (18 जुन)ला झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये 60च्या दशकातील प्रेम, मस्ती, रोमान्स आणि ब्रेकअपची कहाणी दाखवण्यात आली आहे. टीझरची सुरुवात रिव्हरडेल या सुंदर हिल स्टेशनपासून होते.

शालेय मौजमजेपासून सुरू होणारी स्टाेरी हळूहळू प्रेमात बदलते आणि नंतर हृदय तोडून टाकते. सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांची जोडीही मजेशीर आहे. चित्रपटात सुहाना ‘वेरोनिका’ची भूमिका साकारत आहे, तर खुशी ‘बेटी’ची भूमिका साकारत आहे आणि अगस्त्य ‘आर्ची’ची भूमिका साकारत आहे. अशात रेट्रो लूकमध्ये तिघेही खूप छान दिसत असून या टीझरला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

नेटफ्लिक्सचा ‘टुडम’ इवेंट ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे ‘द आर्चीज’ची स्टार कास्टही आली होती. यादरम्यान सर्व स्टार कास्ट रेट्रो लूकमध्ये दिसले. या कार्यक्रमात पहिल्यांदाच त्याचा टीझर दाखवण्यात आला.

‘ए टायगर बेबी प्रोडक्शन’च्या बॅनरखाली बनलेला ‘द आर्चीज’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट ‘आर्ची कॉमिक्स’वर आधारित आहे. अशात सध्या, चाहते शाहरुखच्या लाडली सुहानाच्या पहिल्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (the archies teaser out suhana khan khushi kapoor agastya nanda starring movie on netflix)

अधिक वाचा- 
स्वरा भास्करने एयरपोर्टवर पतीसोबत केल ‘हे’ कृत्य; चाहते म्हणाले, ‘तु नेहमीच…’
करण देओल अन् द्रिशा आचार्य अडकले लग्न बंधनात, नवीन जाेडप्याचे सुंदर फाेटाे एकदा पाहाच

हे देखील वाचा