Monday, September 25, 2023

‘मर्द असाल तर मणिपूर…’ युजरचे ‘काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला आव्हान

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे झालेल्या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. तिथे दोन महिलांना नग्न अवस्थेत फिरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकारणावर अनेक बाॅलिवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच राजकीय नेते मंडळी देखील यावर बोलत आहेत. त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व क्षेत्रातून केली जात आहे. यावरून अनेक पोस्ट सोशल मीडियावर झळकत आहेत. याच प्रकरणावरुन आता नेटकऱ्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ च्या दिग्दर्शकाला थेट खुल आव्हान दिले आहे.

द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले आहे. त्यानंतर ते ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ सीरिज घेऊन आले आहेत. याचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी विवेक अग्निहोत्रींनी ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ याबद्दल एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यावर अनेक आता अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

पोस्ट करताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ” काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर भारतीय न्यायव्यवस्था मार्ग काढताना आंधळी आणि मूक राहिली. तरीही आपल्या संविधानात दिलेल्या वचनानुसार काश्मिरी हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे.” त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “वेळ वाया घालवू नका, तुमच्यात खरोखर काहीतरी करण्याची हिंमत असेल आणि तुम्ही मर्द असाल तर जा आणि मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा.” या ट्विटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “जर मीच सर्व विषयांवर एकच चित्रपट बनवला तर इंडस्ट्रीतील इतर चित्रपट निर्माते काय करतील.”

पुढे त्यांनी लिहिले की, “माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण तुम्हाला माझ्याकडूनच सर्व चित्रपट बनवून घ्यायचे आहेत का? तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये एकही ‘मर्द’ चित्रपट निर्माता नाही का?” त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चा विषय ठरत आहे. (The director of Kashmir Files Vivek Agnihotri was challenged by netizens over the Manipur issue)

अधिक वाचा- 
“आम्ही सुपरस्टार झालो…” बाईपण भारी देवा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वंदना गुप्तेंनी व्यक्त केल्या भावना
दगाबाज मैत्री! सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, पोलिसात तक्रार दाखल

हे देखील वाचा