प्रसिद्ध अभिनेत्याला अटक | बारमध्ये हमला अन् अश्लील बोलण्याचा आहे आरोप

‘डीसी’च्या जस्टिस लीगमध्ये ‘द फ्लॅश’ची भूमिका साकारणारा अभिनेता एझरा मिलरबद्दल (Ezra Miller) एक मोठी बातमी समोर आली आहे. अलीकडेच हवाई, हिलो येथील बारमध्ये गैरवर्तन आणि छळ केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्याला अटक करण्यात आली. ही घटना २७-२८ मार्च दरम्यानच्या रात्रीची आहे. हवाई पोलीस विभागाच्या निवेदनानुसार, एझरा अश्लील बोलला आणि डार्ट्स खेळणाऱ्या माणसावरही हल्ला केला. मात्र नंतर अभिनेत्याला जामिनावर सोडण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Ezra Matthew Miller (@ezramillerflash)

निवेदनात म्हटले आहे, “रविवार, २७ मार्च रोजी, रात्री ११.३० वाजता, दक्षिण हिलो गस्ती अधिकाऱ्यांनी सिल्वा स्ट्रीटवरील बारमध्ये डिसऑर्डली पॅट्रॉनला प्रतिसाद दिला. त्यांच्या तपासादरम्यान, पोलिसांनी निर्धारित केले की, त्या व्यक्तीची ओळख नंतर पटली होती.” (the flash actor ezra miller arrested in hawai)

View this post on Instagram

A post shared by Ezra Matthew Miller (@ezramillerflash)

पोलिसांनी केली अटक
“मिलरने अश्लीलपणे ओरडायला सुरुवात केली आणि तिथे कराओके गाणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा मायक्रोफोन घेतला. बार मालकाने मिलरला अनेक वेळा शांत होण्यात सांगितले ज्याचा काही उपयोग झाला नाही. मिलरला अटक करण्यात आली आणि दोन्ही गुन्ह्याचा आरोप ठोठावण्यात आला. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.” ट्विटरवर ट्विट करून हवाई पोलिसांनी ही बातमी शेअर केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post