Thursday, December 4, 2025
Home व्हिडीओ सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार? कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘आम्ही सर्वजण स्टेजवर एकत्र…’

सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार? कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘आम्ही सर्वजण स्टेजवर एकत्र…’

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये कृष्णा अभिषेक परतला आहे. कॉमेडिन आपल्या मजेदार कॉमेडीने लोकांना खूप हसवत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की, कृष्णाप्रमाणेच सुनील ग्रोवर कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एंट्री करणार का? ज्यावर कृष्णा अभिषेकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला काॅमेडियन? चला जाणून घेउया…

कृष्णा अभिषेक (krushna abhishek) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याला विचारले जात आहे की, ‘सुनील ग्रोव्हर तुझ्यासारखा परतणार का?’ या प्रश्नावर उत्तर देत कृष्णा म्हणाला, ‘हे त्याच्यावर अवलंबून आहे, सुनील एक अद्भुत कलाकार आहे, मी सुनीलचा खूप मोठा चाहता आहे. ताे खूप चांगले प्रदर्शन करताे आणि जेव्हा आम्ही सर्वजण स्टेजवर एकत्र असू तेव्हा नक्कीच खूप मजा येईल. देवाच्या आशीर्वादाने तो दिवस नक्कीच येईल. याबाबत मी खूप सकारात्मक आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडिओवर चाहत्यानी केल्या कमेंट्सचा वर्षाव
कृष्णाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. युजर्स या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सुनील आला, तर अनेक लोक बेरोजगार होतील.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘पण भाऊ, तुम्हाला डिस्चार्ज मिळेल.’ अशात एकजण म्हणाला, ‘सुनील परत येईल.’ एकाने तर लिहिलं की, ‘अजिबात नाही, तो आता येणार नाही, हे लाेक अजूनही इथे शो करत आहेत आणि सुनील फिल्म्स आणि ओटीटी करतोय.'( the kapil sharma show krushna abhishek give big hint on sunil grover return in the show video goes viral watch)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

छान किती दिसते फुलपाखरू! प्रिया बापटचं लेटेस्ट फाेटाेशूट चर्चेत
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये साराने केला डेब्यू, रेड कार्पेटवर ब्राइडल लूकमध्ये दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा