Wednesday, March 27, 2024

‘कोटा फॅक्टरी’ वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नव्या कथेसह असणार अनेक रंजक वळणं

आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे रंगीबेरंगी आहे. जग त्याच्या रंगांनी भरलेले आहे, वगैरे वगैरे इ. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी आहेत जे प्रवेश परीक्षेच्या मोह मायातून बाहेर आले आहेत. त्यांना विचारा जे दिवस -रात्र पुस्तकात डोकं घालून बसतात. त्याचे आयुष्य एवढेच आहे की, आवरा, वाचा, खा, झोपा, सराव करा. यांच्या जीवनात दुसरा कोणताही रंग नाही. यांचे जीवन ब्लॅक अँड व्हाईट झाले आहे. याच संदर्भात टीव्हीएफने दोन वर्षांपूर्वी कोटा, कोटामध्ये राहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनावर ‘कोटा फॅक्टरी’ नावाची सीरिज बनवली. इतकेच नव्हे तर ही सीरिज देखील ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीनेच चित्रित केली होती. दिग्दर्शक राघव सुब्बु वेब सीरिज ‘कोटा फॅक्टरी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये आणखी काही कथा घेऊन पुढच्या महिन्यात परत येत आहे. याच दरम्यान, त्याचा पहिला सीझनही नेटफ्लिक्सवर पोहचला आहेत. ‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजचा दुसरा सीझनही यावेळी नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाणार आहे.

‘कोटा फॅक्टरी’ ही वेब सीरिज देशातील पहिली अशी वेब सीरिज आहे जी ब्लॅक अँड व्हाईट आहे. राजस्थानच्या कोटा शहरात राहणारे विद्यार्थी, तेथील लोक आणि तेथील कोचिंग इंडस्ट्री यांची ही कथा आहे. दरवर्षी जगभरातून लाखो मुले अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा येथे येतात. या विद्यार्थ्यांपैकी एक वैभव आहे. एक सामान्य किशोरवयीन मुलासारखा दिसणाऱ्या वैभवच्या आयुष्यात जीतू भैय्या हा नव्या युगाचा ‘द्रोणाचार्य’ बनून आला आहे. (The second season of the web series ‘Kota Factory’ is coming soon)

‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजमध्ये असे क्षण सतत दाखवले जातात, जे कोटा येथे शिकायला आलेल्या विद्यार्थ्याच्या मनात असतात. ते क्षण कुटुंबाच्या दबावाखाली किंवा स्वत: च्या मनाने कोटा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात दररोज घडतात. मात्र या सीझनमध्ये कथेला नवीन वळण मिळाले आहे. वैभवला बाहेरची दुनियादारी समजली आहे आणि जीतू भैय्या सांगत आहे की, स्वप्न पाहू नका, ध्येयावर लक्ष ठेवा.

‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन २४ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवरील प्रसारित होणार आहे. यापूर्वी, त्याचा पहिला सीझन देखील या ओटीटीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. वैभव आणि जीतू भैय्या व्यतिरिक्त, पहिल्या सीझनमधील पात्रांमध्ये उदय, शिवांगी आणि मीना यांच्या मनोरंजक कथा आहेत. शोमधील पात्र मयूर मोरे, जितेंद्र कुमार यांच्यासह रंजन राज, आलम खान, एहसास चाना, रेवती पिल्लई आणि उर्वी सिंग यांनी साकारले आहेत.

सीरिजचे दिग्दर्शक राघव सुब्बु म्हणाले की, “एक दिग्दर्शक म्हणून मी प्रेक्षकांना प्रेरणा देणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कथा तयार करण्याचा प्रयत्न करतो. ‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये कोटामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडथळे आणि कल्पना असतील. पण यावेळी या कथेची पकड थोडी चांगली आणि वास्तवाच्या थोडीशी जवळ असणार आहे.”

त्याचबरोबर या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा