Saturday, September 30, 2023

चित्रपटात येण्यापूर्वी हाॅटेलमध्ये काम करायची वाणी कपूर; मात्र सुशांतसोबत काम करून बदलले अभिनेत्रीचे आयुष्य

चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री वाणी कपूर आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. वाणी तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रीमध्ये केली जाते. वाणीने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहे, ज्याद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. या सर्वांच्या दरम्यान ती बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरली आहे.

वाणीचा जन्म 23 ऑगस्ट 1988 साली झाला. तिने 2013 साली ‘शुध्द देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात वाणीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटामुळे वाणीला सर्वोत्तम महिला पदार्पणासाठी चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. जयपूर येथे चित्रण झालेला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर यक्षस्वी ठरला. यानंतर वाणीने 2016 साली आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटात काम केले. यात रणवीर सिंगसोबत तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले.

‘बेफिक्रे’ चित्रपटानंतर वाणी प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने बाॅलिवूडमध्ये स्वतः चे एक वेगळे स्थान निर्माण केले. वाणी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ती एका हाॅटेलमध्ये काम करायची. पण वाणीच्या नशीबाने असे वळण घेतले की, तिने बाॅलिवूडमध्ये झगमगाटीत आली.

वाणीने आपले शिक्षण दिल्लीतील माता जयकौर पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर पुढील शिक्षणासाठी ती इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटीमध्ये गेली. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने हाॅटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

वाणी हाॅटेलमध्ये काम करत असताना तिने माॅडलिंग विश्वात प्रवेश केला. वाणीच्या सौंदर्यमुळे ती माॅडलिंगमध्ये चांगलीच प्रसिद्धी आली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आगामी काळात ती अक्षय कुमारच्या ‘बेल बाॅटम’ चित्रपट दिसणार आहे. या शिवाय वाणी सलमान खानसोबत ‘धूम 4’ चित्रपटासाठी काम करत आहे.

हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरे लग्न; मिताली म्हणाली, ‘एवढा मोठा निर्णय…’
‘चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार…’; ‘चांद्रयान 3’साठी कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा

हे देखील वाचा