Monday, October 2, 2023

सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरे लग्न; मिताली म्हणाली, ‘एवढा मोठा निर्णय…’

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या दोघांना मनोरंजन विश्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाते. ते दोघे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यांचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताली त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकेतच सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. सिद्धार्थची आई म्हणजेच सीमा चांदेकर या दुसऱ्यांदा विविहबंधनात अडकल्या आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

मितालीने( Mitali Mayekar) पोस्ट करताना लिहिले की, “Happy married life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की, मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.”

या दरम्यान सिद्धार्थने (Siddharth Chandekar) देखील आईला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्ट करताना लिहिले की, “तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life”

 सिद्धार्थ ने स्वत: पुढाकार घेऊन आईच्या लग्नाला पाठिंबा दिला आहे. त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं आहे, तर काही जण त्याला ट्रोल करत आहेत. ही बातमी सिद्धार्थने पोस्ट करून चाहत्यांना कळवली आहे. मिताली मयेकरने देखील सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केला आहे. जी सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. (Siddharth Chandekar mother got married for the second time Mithali wished her mother-in-law)

अधिक वाचा-
‘चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार…’; ‘चांद्रयान 3’साठी कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा
वयाच्या 12व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते 22 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे त्यांची ‘लव्हस्टोरी’

हे देखील वाचा