Tuesday, June 18, 2024

‘या’ कलाकारांनी त्यांचे लग्न अविस्मरणीय आणि भव्य करण्यासाठी खर्च केला पाण्यासारखा पैसा

बॉलिवूडमधील कोणतेही फंक्शन म्हटले की ते ग्रँड असणार हे गृहीतच धरले जाते. अगदी लहानातल्या लहान कार्यक्रमापासून लग्नापर्यंत सर्वच गोष्टी कलाकारांच्या हटके आणि भव्य असतात. आता कलाकारांच्या लग्नाचेच घ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिचे लग्न हे आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा असतो. हा दिवस अधिक खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. कलाकार त्यांचे लग्न अतिशय खासगी पद्धतीने जरी करत असले, तरी ते भव्य आणि आलिशान असते. लग्नांमध्ये पाण्यासारखा पैसे खर्च केला जातो. अगदी कपड्यांपासून, दागिने, जेवण, लग्नाची जागा सर्वच गोष्टींकडे बारीक लक्ष दिले जाते. बॉलिवूडमध्ये नजर टाकली तर लक्षात येईल की, आतापर्यंत मोठमोठ्या कलाकारांच्या लग्ने डोळे दिपवणारा एक उत्सवच होती. नुकतेच अभिनेता राजकुमार आणि पत्रलेखा लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आणि लवकरच अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल देखील लग्न करणार आहेत. आता हे लग्न नक्कीच गाजणार हे तर नक्की. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया अशा कलाकारांची नावे ज्यांचे लग्न सर्वात महाग आणि भाव होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली :
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये अतिशय खासगी आणि गुपचूप पद्धतीने लग्न केले. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देखील दिले. या दोघांनी त्यांच्या लग्नामध्ये भरपूर पैसे खर्च केला. अनुष्काची एंगेजमेंट रिंगचं जवळपास १ कोटीची हत्ती. एका माहितीनुसार या दोघांच्या लग्नात १०० कोटीपेक्षा अधिकच खर्च झाला.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग :
दीपिका आणि रणवीर यांनी देखील इटलीमध्येच लगीनगाठ बांधली. दिपवीर यांचे लग्न इंडस्ट्रीसोबतच सर्व प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय होता. रणवीर आणि दीपिका यांनी इटलीमध्ये जिथे लग्न केले त्या व्हिलाचे एका दिव्सचाहे भाडे २४.७५.००० हजार एवढे होते. या दोघांनी देखील लग्नानंतर भारतामध्ये अनेक ठिकाणी रिसेप्शन दिले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास :
प्रियांका आणि निक यांच्या लग्नाने मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट मिळवले. या दोघांनी जयपूरच्या उमेदभवन येथे लग्न केले. या भवनचे एका दिवसाचे भाडे ६४ लाख रुपये होते आणि यांच्या लग्नाचे फंक्शन ५ दिवसांचे होते, यावरून आपण अंदाज लावू शकतो की त्यांनी फक्त लग्नाच्या ठिकानास्ताहीच किती पैसे खर्च केला असेल. जवळपास १०५ कोटी खर्च करून त्यांनी लग्न केले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन :
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी २००७ साली मुंबईत मोठ्या थाटात लग्न केले होते. त्यांच्या लग्नात ७ कोटी रुपये खर्च केले होते.

करीना कपूर आणि सैफ अली खान :
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी असलेल्या करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केले. यांचे लग्न देखील खूप भव्य पद्धतीने झाले. करिनाने तिच्या लग्नात ४ कोटी रुपयांचे तर सोनेच घातले होते. यावरून त्यांनी लग्नात किती खर्च केला असेल त्याचाच अंदाज लावू शकता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा