×

रॅप गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘या’ बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील गायले चित्रपटांमध्ये रॅप

संगीत आपल्याला नेहमीच चित्रपटांपेक्षा जास्त रस चित्रपटाच्या संगीतात असतो. सिनेमा हिट गेला की फ्लॉप हे नंतर आधी सिनेमाचे म्युझिक कसे आहे, हे महत्वाचे असते. आपल्याकडे आपण पैले तर संगीतकार नेहमीच विविध प्रयोग करत वेगवेगळ्या प्रकारचे संगीत प्रेक्षकांसाठी घेऊन येताना दिसतात. आजच्या घडीला तरुणांमधला सर्वात जास्त लोकप्रिय ठरणारा संगीताचा प्रकार म्हणजे रॅप सॉन्ग. या रॅप म्युझिकने आजच्या तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, या रॅप सॉन्गची सुरुवात कधी झाली? अहो सांगितले तर नक्कीच आश्चर्य वाटेल की, या रॅप म्युझिकची सुरुवात अशोक कुमार यांनी केली आहे. ‘रेलगाड़ी…रेलगाड़ी…छुक छुक छुक रेलगाड़ी… ‘ हे त्यांनी गायलेले पहिले रॅप सॉन्ग आहे. अशोक कुमार यांनाच भारतीय चित्रपटाचे खरे रॅपर मानले जाते. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी रॅप गाणे गायले आहे. अजय देवगण देखील त्याच्या आगामी ‘रनवे ३४’ मध्ये रॅप गाणे गाताना दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया अशाच काही मोठ्या कलाकारांबद्दल ज्यांनी रॅप सॉन्ग चित्रपटांसाठी गायले आहे.

रणवीर सिंग :
२०१९ साली आलेल्या सुपरहिट अशा ‘गली बॉय’ सिनेमात रणवीर सिंगचा एकदम अलगच अंदाज पाहायला मिळाला. या सिनेमात त्याने एका रॅपरची भूमिका साकारली होती. ‘अपना टाइम आएगा’ या रॅप गाण्याने त्याने सर्वांनाच हैराण केले. त्याचा अंदाज, स्टाईल एकदमच रॅपर सारखी होती. याशिवाय त्याने ‘लेडीज वर्सेस रिक्की बहल’ सिनेमात ‘आदत से मजबूर’ गाण्यातही रॅप गायले आहे.

आमिर खान :
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने देखील रॅप गायले आहे. २०१६ साली आलेल्या ‘दंगल’ सिनेमात त्याने महावीरसिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील ‘धाकड’ या गाण्याच्या रिप्राइज्ड व्हर्जनसाठी आमिरने रॅप केले होते.

वरुण धवन :
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ सिनेमातील ‘लकी तू लकी मैं’ गाण्यात वरुणने छोटेसे रॅप केले होते. त्यानंतर त्याने ‘ABCD 2’ सिनेमात हॅप्पी बर्थडे गाण्यात रॅप केले.

अक्षय कुमार :
खिलाडी कुमार असलेल्या अक्षयने देखील त्याच्या २००९ साली आलेल्या ‘चांदनी चौक टू चाइना’ सिनेमाच्या टायटल सॉन्गमध्ये रॅप केले होते.

अमिताभ बच्चन :
महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील २००९ साली आलेल्या त्याच्या ‘अलादिन’ सिनेमात रॅप केले. त्यांनी ‘जीनी’ गाण्यात रॅप केले होते. याशिवाय त्यांनी एका जाहिरातीसाठी सुद्धा रॅप केले.

अभिषेक बच्चन :
प्रतिभावान अभिनेता असलेल्या अभिषेक बच्चनने त्याच्या २००५ साली आलेल्या ‘ब्लफमास्टर’ सिनेमात ‘एक मैं और एक तू’ गाण्यात रॅप केले होते.

हेही वाचा-

Latest Post