×

नाद करा पण आमचा कुठं! अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायातून चिक्कार पैसा कमवणारे बॉलिवूड सुपरस्टार्स; शाहरुख तर…

हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपलं स्वत:चं असं एक वेगळं नाव निर्माण केलं आहे. ज्यामुळे ते प्रत्येक सिनेमासाठी चिक्कार फी घेतात. त्यांच्या सिनेमांची फीच कोट्यवधी रुपयांच्या घरात असते. हे कलाकार सिनेमातून कमाई तर करतातच, पण हेच कलाकार अभिनयासोबतच खिशाला ताण पडू नये म्हणून व्यवसायातही आपला हात आजमावत असतात. त्यातूनही त्यांची कोट्यवधी रुपयांची कमाई होते. बॉलिवूडच्या किंग खानपासून ते ‘हँडसम हंक’ ऋतिक रोशनपर्यंत अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश या यादीत आहे. चला तर जाणून घेऊया कोणते कलाकार सिनेमांव्यतिरिक्त व्यवसायातून भरभक्कम कमाई करतात.

सलमान खान
‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) आपल्या सिनेमाव्यतिरिक्त जाहिरातींमधूनही कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. तो एका जाहिरातीसाठी ४ ते १० कोटी रुपये फी घेतो. यासोबतच तो सिनेमांची निर्मितीही करतो. त्याचे स्वत:चे व्यवसायही आहेत. त्याचे ‘बिइंग ह्युमन’ हे ब्रँडही जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकदा सोशल मीडियामार्फत तो याचे प्रमोशनही करताना दिसतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान खान यात्रा डॉट कॉममध्येही ५ टक्क्यांचा भागीदार आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

ऋतिक रोशन
बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ आणि चार्मिंग गुडलूक्स असणारा अभिनेता ऋतिक रोशनसुद्धा (Hrithik Roshan) व्यवसायात चांगलीच गुंतवणूक करतो. ऋतिक त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मुंबईत त्याची स्वत:ची जीम आहे. याव्यतिरिक्त बंगळुरू येथे फिटनेस जीम ‘क्युरफिट’ यामध्येही त्याची भागीदारी आहे. यासोबतच त्याचा आपला ‘एचआरएक्स’ हा ब्रँडसुद्धा आहे. त्यातील अधिक भागीदारी त्याने मिंत्राला विकली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

शाहरुख खान
शाहरुख खान (Shahrukh Khan) बॉलिवूडचा सुपरस्टार तर आहेच, पण त्यासोबच तो एक यशस्वी व्यवसायिकही आहे. शाहरुख ५०० कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसचा सहमालक आहे. यासोबतच तो आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचाही मालक आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अक्षय कुमार
बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नावाचा समावेश होतो म्हणजे होतोच. यशस्वी अभिनेता, यशस्वी फॅमिली मॅनसोबतच तो यशस्वी व्यवसायिकही आहे. अक्षयने नुकतेच पबजी गेम बंद झाल्यानंर FAU-G नावाची एक गेम लाँच केली होती. त्याव्यतिरिक्त त्याने २००८ साली हरी ओम प्रोडक्शन्सची सुरुवातही केली होती, ही कंपनी त्याच्या वडिलांच्या नावावर आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

अजय देवगण
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) समावेशही या यादीत होतो, जो सिनेमांसोबतच व्यवसायातही गुंतवणूक करतो. अजयने २००० साली एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती, त्या कंपनीचं नाव ‘अजय देवगण फिल्म्स’ असं आहे. तसेच तो एका व्हीएफएक्स स्टुडिओचाही मालक आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

माध्यमांतील वृत्तांनुसार, अजय देवगणने गुजरातच्या चरंका सोलर प्रोजेक्ट ‘Roha Group’मध्येही गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-

Latest Post