Tuesday, April 16, 2024

चित्रपटाच्या शूटींग दरम्यान गरोदर होत्या ‘या’ अभिनेत्री, काहींनी जिद्दीने केलं चित्रीकरण पूर्ण; पाहा यादी

मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, अनेकदा तिला मायानगरी असेही म्हटलं जातं. मुंबईतील बॉलिवूड म्हणजेच स्वप्नांची चंदेरी दुनिया, या चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण मुंबईत येत असतात. इथे मिळणारे ग्लॅमर, पैसा, लोकप्रियता याला कसलीच तोड नाही.

सर्वसामान्य प्रेक्षकांना सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच कुतुहूल वाटतं. त्यातही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल तर सर्वाधिक चर्चा होत असते. त्यांचे कपडे, दागिने, वस्तू , अफेयर, लग्न, त्यांची प्रेग्नेंसी आदी वैयक्तिक गोष्टी देखील अभिनेत्रींसाठी सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतात.

Kareena Kapoor Pregnent
Kareena Kapoor

बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा आणि करीना कपूर-खान या दोन अभिनेत्री सध्या गरोदर आहेत. कोणतीही अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्यास, साहजिकच त्यांच्या कामावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होतो.

काही अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्यावर हातात असलेले सर्व काम लवकर पूर्ण करतात, तर काही जणी काम सोडून देतात. आजच्या या लेखात आपण अशा काही अभिनेत्री पाहणार आहोत, ज्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होत्या. त्यातील काहींनी काहींनी चित्रपट पुर्ण केले तर काहींनी मध्येच सोडले

जया बच्चन :

सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. जया यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. सन १९७३ मध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतरही त्यांनी अनेक सिनेमात काम केले.

यानंतरच्या काळात रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटात जया बच्चन काम करत होत्या. मात्र, महत्वाची बाब म्हणजे शूटिंग दरम्यान जया बच्चन  प्रेग्नेंट होत्या आणि त्यांनी पांढऱ्या साडीमागे त्यांचे पोट लपवले होते.

Jaya Bachchan & Amitabh Bachchan
Jaya Bachchan & Amitabh Bachchan

चित्रपटाच्या काही सीन्समध्ये लक्षपुर्वक पाहिले तर त्यांचे मोठे पोट दिसून येते. परंतु तेव्हा लोकांच्या लक्षात ही बाब आली नव्हती. १५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ सिनेमा ब्लॉकबस्टर हिट झाला.

जया यांनी त्यांच्या पहिल्या प्रेग्नेंसी नंतर चित्रपटात काम करणे कमी केले. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जूही चावला :

सन १९८४ साली ‘मिस इंडिया’ झालेल्या जुहीने १९८६ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाने. त्यानंतर जुहीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

जुहीने हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ या भाषेतील सिनेमांमध्ये काम केले. जुहीने उद्योगपती जय मेहता यांच्यासोबत १९९५ मध्ये खासगी समारंभात लग्न केले.

Juhi Chaula PIC
Juhi Chaula PIC

जुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत. जुही ‘झंकार बिट्स’ चित्रपटाचे शूटिंग करत असतानाच प्रेग्नेंट झाली होती. मात्र, तरीही तिने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. चित्रपटात तिने ‘शांती’ या प्रेग्नेंट स्त्रीची भूमिका निभावली असल्याने, लोकांना ती खरच प्रेग्नेंट असल्याचे समजले देखील नाही. झंकार बिट्स हा सिनेमा जून २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

ऐश्वर्या राय बच्चन :

विश्वसुंदरी म्हणून ओळख मिळवणारी ऐश्वर्या अभिनयातही उजवी ठरली. १९९७ साली आलेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ऐश्वर्याने हिंदीखेरीज तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश भाषांमधील चित्रपटात काम केले.

ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. लग्नानंतरही ऐश्वर्या चित्रपटातून काम करत आहे. १६ नोव्हेंबर २०११ साली ऐश्वर्याने मुलगी अराध्याला जन्म दिला.

Aishwarya Rai Bachchan 3
Aishwarya Rai Bachchan 3

ऐश्वर्या प्रेग्नेंसी अगोदर मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोइन’ चित्रपटात काम करत होती. मात्र तिने तिच्या प्रेग्नेंसीमुळे चित्रपटातून काढता पाय घेतला. ६४ व्या कान्स फेस्टिवल मध्ये या सिनेमाचे ऐश्वर्यावर आधारित पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा करीना कपूरला घेऊन पूर करण्यात आला.

काजोल :

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून काजोल ओळखली जाते. १९९२ मध्ये ‘बेखुदी’ या सिनेमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९३ साली आलेल्या ‘बाजीगर’ चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळून दिली.

काजोलच्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वुई आर फॅमिली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती प्रेग्नेंट होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आठच दिवसांनी तिने तिच्या मुलाला ‘युग’ ला जन्म दिला.

श्रीदेवी :

आपल्या डान्सने, अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी मिस हवाहवाई म्हणजेच श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. १९७५ साली श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले.

Shridevi
Shridevi

सन १९८३ मध्ये आलेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाने श्रीदेवी यांना एका रात्रीत स्टार बनवले. श्रीदेवी यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी १९९६ मध्ये लग्न केले. त्यांना जान्हवी आणि ख़ुशी नावाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या ‘जुदाई’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी त्या प्रेग्नेंट झाल्या. श्रीदेवी यांच्या प्रेग्नेंसीने लोकांचे खूप लक्ष वेधून घेतले. कारण श्रीदेवी ह्या लग्नाधीच प्रेग्नेंट झाल्या होत्या.

श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्राततील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०१८ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले.

हे देखील वाचा